जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

गॅसचा काळा बाजार,पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी) 

   कोपरगाव शहरात अवैध व्यवसाय कमी होण्याची काही चिन्हे दिसत नाही.आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून उपयोग होताना दिसत नाही कारण असे असते तर या अवैध व्यवसायावर नियंत्रण आले असते.मात्र असे होताना दिसत नाही.कारण काल मध्यरात्रीच नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरगुती गॅसचा अवैध व्यवसाय करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा भांडाफोड केला असून त्यात आरोपी मनोज चंद्रकांत गिरमे,(वय ४५ वर्षे),सिध्दार्थ संदिप गिरमे,(वय २६ वर्षे) दोघे रा.निवारा हौसिंग सोसायटी या दोघांना पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

संकल्पित छायाचित्र.

दरम्यान घटनास्थळी नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २२ हजार रुपये किमतीचा एच.पी.गॅस कंपनीच्या लाल रंगाच्या घरगुती वापराच्या एकुण ०८ गैस टाक्या,त्यामध्ये ४ गॅस टाक्या भरलेल्या प्रत्येकि गॅस टाकीसह अंदाजे किमत ३ हजार रुपये व ०३ रिकाम्या घरगुती गॅस टाक्या प्रत्येकी २ हजार रुपया प्रमाणे,०१ व्यवसायिक गॅस टाकि भरलेली प्रत्येकि अंदाजे किंमत ४ हजार रुपये जूनी वापरती,१५ हजार रुपये किमतीची एक गॅस टाक्या भरण्यासाठी वापरण्यात येणारे मशिन,५ हजार रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा,या शिवाय १ लाख रु.किंमतीची पांढरे रंगाची मारुती कंपनीची ओमिनी चारचाकी गाडी तिचा क्र.एम.एच.-४१-व्ही.-१५४७ असा एकूण 02 लाख 41 हजार किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

   कोपरगाव शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याची तक्रार खुद्द तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी निवडणुकीच्या धामधुमीत केली होती.याबाबत आमच्या प्रतिनिधीने वारंवार आवाज उठवला होता.वाळू चोर,रेशन चोर,मटका,गुटखे आदी अवैध व्यवसायाला मोठी बरकत आली होती.या पूर्वी गावठी कट्ट्यांचा मोठा सुळसुळाट झाला असल्याचा गाजावाजा झाला होता.त्यातून विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिस ठाण्याच्या जवळ जबरेश्वर मंदिराजवळ दोन टोळ्यांत दिवसा गोळीबार झाला होता.त्यातून मोठा राजकीय तमाशा झाला होता.त्यातून कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत एकमेकावर मोठी चिखलफेक झाली होती.त्यानंतर तरी यावर नियंत्रण येईल अशी अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे.त्यावर राजकीय पक्षांनी नियंत्रण तर दूरच पण यातील यांनी जवळपास 13 आरोपींना राजकीय अभय देऊन त्यांना तिकिटे दिली होती.एका अर्थाने राजकीय अभय दिले असल्याचे आढळून आले होते.त्याचे परिणाम आता दिसू लागले आहे.कारण काल रात्रीच नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांना कोपरगाव शहरात अवैध घरगुती गॅसचे मोठे रॅकेट असल्याची खबर लागली होती.त्यानुसार त्यांनी काल पहाटे 2.45 वाजता संजीवनी कारखाना रस्त्यालगत असलेल्या व्यापारी संकुलाजवळ धाड टाकळी असता त्यांना त्या ठिकाणी एक मारुती ओम्नी गाडी घरगुती गॅसचा काळा बाजार करताना आढळून आली आहे.घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये अवैधपणे गॅस भरून (रिफिलिंग) त्याची चढ्या दराने विक्री करण्यासाठी हा प्रताप केला असल्याचे उघड झाले आहे.

  त्या ठिकाणी आरोपी नाव मनोज चंद्रकांत गिरमे,(वय- ४५ वर्षे),सिध्दार्थ संदिप गिरमे,(वय-२६ वर्षे) दोघे रा.निवारा हौसिंग सोसायटी या दोघांसह मजुम्मील जाकिर मन्यार,(वय-२२ वर्षे),सद्दाम जाकिर मन्यार (वय-२५ वर्षे) फहीम हारुन शेख,दोघे रा.सिध्दार्थनगर,चांदवड,जि.नाशिक (वय-३० वर्षे)रा.स्वामी समर्थ मंदिराजवळ,राघोबादादाचा वाडा आदींना जेरबंद केले आहे.

   दरम्यान त्या ठिकाणी त्यांना २२ हजार रुपये किमतीचा एच.पी.गॅस कंपनीच्या लाल रंगाच्या घरगुती वापराच्या एकुण ०८ गैस टाक्या,त्यामध्ये ४ गॅस टाक्या भरलेल्या प्रत्येकि गॅस टाकीसह अंदाजे किमत ३ हजार रुपये व ०३ रिकाम्या घरगुती गॅस टाक्या प्रत्येकी २ हजार रुपया प्रमाणे,०१ व्यवसायिक गॅस टाकि भरलेली प्रत्येकि अंदाजे किंमत ४ हजार रुपये जूनी वापरती,१५ हजार रुपये किमतीची एक गॅस टाक्या भरण्यासाठी वापरण्यात येणारे मशिन,५ हजार रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा,या शिवाय १ लाख रु.किंमतीची पांढरे रंगाची मारुती कंपनीची ओमिनी चारचाकी गाडी तिचा क्र.एम.एच.-४१-व्ही.-१५४७ असा एकूण 01 लाख 51 हजार किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

   दरम्यान घटनास्थळी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने आदींनी भेट दिली आहे.आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी  सुनिल रमेश मालणकर अहिल्यानगर यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र.-११/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम २२३,सह जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ प्रमाणे पाचही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close