गुन्हे विषयक
शहरात अनैतिक व्यवसाय,कोपरगाव पोलिसांची धाड?

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात मागील आठवड्यात धारणगाव रोड लगत असलेल्या एका व्यापारी संकुलात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खबर शहर पोलिसांना लागली होती.मात्र त्यांनी त्या ठिकाणी पोलिस अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तो खोडसाळपणा असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे शहरात सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांना पायबंद बनण्यास मदत होणार असल्याची माहिती उघड झाली आहे.

दरम्यान महसूल अधिकारी कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत गुंतले असल्याचा गैरफायदा घेत अनेक वाळूचोरांनी आपले उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यातून त्यांनी वाळूचोरी करण्यास जोरदार सुरुवात केली असल्याचं वृत्त आहे.आता महसूल आणि पोलिस अधिकारी त्यांचे विरुद्ध कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याची तक्रार खुद्द तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी निवडणुकीच्या धामधुमीत केली होती.याबाबत आमच्या प्रतिनिधीने वारंवार आवाज उठवला होता.वाळू चोर,रेशन चोर,मटका,गुटखे आदी अवैध व्यवसायाला मोठी बरकत आली होती.या पूर्वी गावठी कट्ट्यांचा मोठा सुळसुळाट झाला असल्याचा गाजावाजा झाला होता.त्यातून विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिस ठाण्याच्या जवळ जबरेश्वर मंदिराजवळ दोन टोळ्यांत दिवसा गोळीबार असला होता.त्यातून मोठा राजकीय तमाशा झाला होता.तर काही वर्षापूर्वी कर्मवीर नगर परिसरात सन-2019-20 दरम्यान एक घटना अशीच उघड झाली होती.त्यात सदर महिला आपले पती जालण्याचे पोलिस अधीक्षक यांचे स्वीयसहाय्यक असल्याची बतावणी (नागरिकांमध्ये भीती पसरविण्यासाठी) अफवा पसरवून राजरोस अनैतिक व्यवसाय करीत होती.त्याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.याबाबत आमच्या प्रतिनिधीने त्यावेळी त्यावर सविस्तर वृत्तांकन प्रसिद्ध केले होते.त्यावेळी सदर पोलिस निरीक्षकांनी त्यांचे माध्यमांसमोर जोरदार खंडन केले होते.मात्र ‘ न्यूजसेवा’ च्या बातमीने जागे झालेल्या पत्रकारांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता अनेक अनैतिक गोष्टींचे पुरावे त्यांचे हाती आले होते.त्यावरही संबंधित पोलिस निरीक्षकांनी मोठा साळसूदपणाचा आव आणला होता.दरम्यान संबंधित अधिकाऱ्याने,”कोपरगाव म्हणजे पुणे मुंबई महानगरे नाही” असा असा हास्यपद दावा केला होता.मात्र तेथे हजर असलेल्या प्रतिनिधीने जेंव्हा पुरावेच दाखवले त्यावर त्यांची पाचावर धारण बसली होती.त्यावेळी दुसऱ्या दिवशी सदर महिलेने आपले चंबूगबाळ गुंडाळून पोबारा केला होता.जाताना मात्र घर मालकाचे मोठे नुकसान केले असल्याचे उघड झाले होते.त्यावर सदर महिलेचा बचाव करणारा पोलिस अधिकारी मात्र ओशाळला होता हे विशेष !

दरम्यान तो प्रकार कमी की काय तो कोपरगावात धारणगाव रोडला एक पंपाजवळ असलेल्या व्यापारी संकुलाच्या वरील मजल्यावर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची बातमी पोलिसांपर्यंत आठ दिवसापूर्वी भगवान बाबा जयंतीच्या दिवशी पोहचली होती.त्यानुसार कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी एक जोडपे राहत होते.मात्र असा कोणताही प्रकार आढळून आला नाही.त्याठिकाणी काही नागरिकांनी तो खोडसाळपणा केला असल्याचा पोलिसांचा दावा आहे.मात्र याबाबत शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.मात्र कोपरगाव शहर पोलिसांनी अधिक सतर्क राहणे उत्तम असल्याची प्रतिक्रिया शहरात उमटली आहे.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
दरम्यान महसूल अधिकारी कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत गुंतले असल्याचा गैरफायदा घेत अनेक वाळूचोरांनी आपले उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यातून त्यांनी वाळूचोरी करण्यास जोरदार सुरुवात केली असल्याचं वृत्त आहे.आता महसूल आणि पोलिस अधिकारी त्यांचे विरुद्ध कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.



