गुन्हे विषयक
तरुणाची आत्महत्या,अकस्मात मृत्यूंची नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत पशू वैद्यकीय दवाखान्याजवळ रहिवासी असलेला पंचवीस वर्षीय तरुण सागर रमेश भारुड याने आज दुपारी 04 च्या सुमारास अज्ञात कारणाने घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याचे उघड झाले आहे.त्याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केलं आहे.त्याच्या पश्चात आई.एक भाऊ आणि बहीण असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

मयत तरुण सागर भारुड यास दुर्मिळ आजार असल्याने तो त्रस्त होता.त्यासाठी मोठा खर्च असल्याने तो तणावात होता अशी माहिती उपलब्ध झाली असून या तणावात त्याने आज घरी कोणी नाही ही संधी साधत आपल्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
किशोरावस्था व तरुणावस्था ही तणावपूर्ण असते.ती मोठ्या बदलांनी भरलेली असते.यामध्ये शरीरातील बदल,विचारांमधील बदल आणि भावनांमध्ये बदल यांचा समावेश होतो.ताणतणाव,गोंधळ,भीती आणि शंका या तीव्र भावना किशोरवयीन मुलांच्या समस्या सोडवण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात.त्यांना यशस्वी होण्यासाठी दबाव देखील जाणवू शकतो.अगदी किशोरवयीन मुलांनाही याचा परिणाम होऊ शकतो.काही किशोरवयीन मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी,सामान्य विकासात्मक बदल इतर घटनांसह एकत्रित केल्याने खूप अस्वस्थ करणारे असू शकतात.तर काही तरुण आपली आर्थिक तणावाची परिस्थिती त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडू शकते अशीच घटना आज कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत उघडकीस आली असून यातील मयत तरुणाचे वडिलांचे तीन वर्षापूर्वी निधन झाले होते.तो आपल्या आई मध्ये एकत्र राहत होता.तर त्याचा मोठा भाऊ हा विभक्त राहत होता.त्याला दुर्मिळ आजार असल्याने तो त्रस्त होता.त्यासाठी मोठा खर्च असल्याने तो तणावात होता अशी माहिती उपलब्ध झाली असून या तणावात त्याने आज घरी कोणी नाही ही संधी साधत आपल्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान ही घटना घरच्या माणसाचे लक्षात आली असता त्यांनी त्यास तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता तेथील उपचार करणारे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.या प्रकरणी त्याच्यावर शव विच्छेदन केले असून त्याची रवानगी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात केली असल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान या प्रकरणी अद्याप कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली नाही त्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची महिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.प्रसाद सोनवणे हे करीत आहेत.या घटनेनं संवत्सर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.