जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

….या शहरात तुंबळ हाणामारी,१० जखमी,१६ अटक,०२ पोलिस जखमी,गुन्हा नाही ?

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

    कोपरगाव शहरात रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास सत्ताधारी राष्ट्रवादीचे आ.काळे गट,मनसे विरूध्द शिवसेना (ऊ.बा.ठा.) गटात रस्त्यावरून गाडी घालण्याच्या कारणावरून दोन गटात तलवार,लोखंडी रॉड,क्रिकेटचे स्टंप,लाकडी काठ्या,दगड विटांनी तुंबळ हाणामारी होऊन त्यात यमानाजी सुंबे व द्यानेश्वर भांगरे आदी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह विवेक राजेंद्र आव्हाड,गौरव सुनील मोरे,अविनाश नामदेव गीते,दत्तात्रय रंगनाथ पंडोरे,हिराबाई राजेंद्र आव्हाड तर दुसऱ्या गटातील सुनील योगेश गोर्डे,वनिता नारायण गोर्डे,अरुण बाजीराव जोशी,राजेंद्र बाजीराव जोशी,शुभम राजेंद्र जोशी आदी १० जण गंभीर जखमी झाले असून ४१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.यातील सोळा जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात दाखल करण्याची तयारी सुरू होती.मात्र यात आरोपी विरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मात्र पोलिसांनी दाखल केला असल्याचे दिसत नाही हे विशेष !

 

उपचार घेताना जखमी पोलिस कर्मचारी दिसत आहे.

दरम्यान यातील एका माहिती नुसार सत्ताधारी गटाचा एक नेता आपल्या लाडक्या कर्मचाऱ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्ह्याची भा.न्या.संहिता कलम १०९ नुसार (जुने कलम ३५३) कारवाई होऊ नये यासाठी शिर्डी उपविभागीय कार्यालयात ठाण मांडून बसले होते.त्यांच्यात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांत चांगलीच खडाजंगी झाली असल्याची खबर आहे.तर दुसरीकडे जखमी पोलिस कर्मचारी यमानाजी सुंबे व द्यानेश्वर भांगरे हे दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

 

घटनास्थळी पडलेला दगड विटांचा खच.

   कोपरगाव शहर आणि तालुका गुन्हेगारांना सुरक्षित आश्रयस्थान बनले असल्याचे वारंवार उघड झाले आहे.यापूर्वीही शहर पोलिस ठाण्याच्या नाकाखाली स्मामी समर्थ केंद्राजवळ वाळू चोर आणि रेशन माफिया यांच्यात थेट गोळीबार होऊन रणकंदन माजले होते.शहरात तर वाळूसह अनेक अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.अवैध व्यवसायात तर राजकिय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामील असल्याचे दिसून येत असल्याची शहर आणि तालुक्यात जोरदार चर्चा आहे.त्यामुळे कारवाई कशी करायची असा सवाल पोलिस अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पडला असल्यास नवल नाही.आता हे कमी की काय भर शहरातील दुकानाच्या लुटीच्या त्यानंतर रस्ता लुटीच्या घटना समोर येऊ आल्या होत्या.देर्डे फाटा या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने लपलेली चोरट्यांची टोळी काही महिन्यापूर्वी पकडली होती.काकडी येथे एका रात्रीत आई,वडील आणि मुलगा तीन खून पडले होते.त्यांना अद्याप शासन झालेले नाही.शहरातील मोटारी आणि दुचाकी चोरीचे सत्र कमी होताना दिसत नाही.यात बऱ्याच वेळा राजकीय नेते आणि त्यांचे स्विय सहाय्यक आरोपींना मदत करतात असा नागरिक आरोप करत होते.मात्र मदत करणे ही बाब बहुधा कमी वाटतं असावी म्हणून सत्ताधारी गट आता थेट रणांगणात उतरला असल्याचे दिसत आहे.यातील आरोपी अरुण बाजीराव जोशी हा इसम आ.आशुतोष काळे यांचा स्वीय सहाय्यक असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यात तो एकटा नाही तर त्याचा ठेकेदार भाऊ राजेंद्र जोशी,पुतण्या शुभम राजेंद्र जोशी आदी एकच कुटुंबातील तीन जण सामील असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.यातून परस्परांवर दोन स्वतंत्र दोन गुन्हे दाखल झाले असले तरी पोलिस कर्मचाऱ्यावर थेट हात टाकणाऱ्यांवर मात्र अद्याप सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झालेला नाही हे  विशेष !

दरम्यान आज यातील शिवसेनेचे नगरपरिषदेचे माजी सभापती अनिल आव्हाड यासह अन्य अटक कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,जिल्हा संघटक कलविंदर दडियाल,इरफान शेख,रवी कथले आदींनी गर्दी केली होती,त्यांनी यातील गुन्हेगारांना कड्क शासन व्हावे अशी मागणी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

   दरम्यान यातील एका माहिती नुसार सत्ताधारी गटाचा एक नेता आपल्या लाडक्या कर्मचाऱ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्ह्याची (जुने कलम ३६३) कारवाई होऊ नये यासाठी शिर्डी उपविभागीय कार्यालयात ठाण मांडून असल्याचे माहिती आहे.तर दुसरीकडे जखमी पोलिस कर्मचारी सूंबे व भांगरे हे दोन जण शेवटच्या घटका मोजीत असल्याचे माहिती आहे.त्यांचे जबाब श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या उपस्थितीत घेतले असल्याचे समजत आहे.

 

घटनेनंतर कोपरगाव शहर पोलिसांचा वाढलेला बंदोबस्त.

दरम्यान रात्री ११.१५ च्या सुमारास जुन्या बेटातून जाणारा रस्ता रात्री बंद केलेला असतो.तो कोणाच्या परवानगीने असतो ? व तो बंद ठेवता येतो का ? हा सवाल कोणीही विचारण्याची शहरात वर्तमानात सोय नाही.कोणी कारवाई करायची नाही असा अलिखित दंडक आहे.त्यामुळे तो रात्रीही बंद होता.त्यामुळे हे मोठे महाभारत घडले तरीही पोलिस आणि नगरपरिषद प्रशासन कारवाई करणार का ? हा प्रश्न तसाच निरुतरित रहाणार आहे.

  दरम्यान यातील पहिल्या गुन्ह्यात कोपरगाव  बेट भागातील मोहिनिराजनगर भागात स्वतंत्र दिन गटाच्या देवींची स्थापना करण्यात आली आहे.यातील शिवसेनेचे माजी सभापती अनिल उर्फ कालू आप्पा आव्हाड यांच्या मंडळाची असून दुसरी मनसेचे शहराध्यक्ष सतीश काकडे यांच्या मंडळाची असल्याची माहिती आहे.तर दक्षिण बाजूने आ.आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी आणि त्यांचे बंधू राजेंद्र जोशी यांच्या मंडळाच्या देवी बसल्या आहेत.दरम्यान रात्री ११.१५ च्या सुमारास त्या ठिकाणचा रस्ता रात्री बंद केलेला असतो.तो कोणाच्या परवानगीने असतो ? व तो बंद ठेवता येतो का ? हा सवाल कोणीही विचारण्याची शहरात वर्तमानात सोय नाही.कोणी कारवाई करायची नाही असा अलिखित दंडक आहे.त्यामुळे तो रात्रीही बंद होता.

रात्री घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झालेल्या बाचाबाची दिसत आहे.

 

दरम्यान या गोंधळानंतर सर्वोच्च न्यायालयाचे आदेशा प्रमाणे ज्येष्ठ नागरिक,लहान मुले रुग्ण,सकाळी आपल्या कर्तव्यावर जाणारे नोकरदार आदींच्या हितासाठी सार्वत्रिक कार्यक्रम रात्रीचे केवळ १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे सक्त आदेश असताना ते उशिरापर्यंत का सुरू ठेवले जातात ? असा प्रश्न नागरिकांनी विचारला असून या बेताल गोंधळानंतर आता वरिष्ठ पोलिस अधिकारी कारवाई करण्याची शक्यता वाढली आहे.

  दरम्यान त्या ठिकाणाहून पहिल्या गुन्ह्यातील फिर्यादी विवेक राजेंद्र आव्हाड (वय-२४) रा.निमगाव चांगदेवनगर,ता.राहाता याने आपल्या ताब्यातील मारुती ब्रिझा ही गाडी (क्रं.एम.एच.१७ डी.जे.६०५३) ही घेऊन मधून जात असताना खंडोबा मंदिराजवळ ती या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी व आ.काळे यांचा स्वीय सहाय्यक अरुण जोशी व येथील आरोपी अरुण बाजीराव जोशी,(स्वीय सहाय्यक) त्याचा मोठा भाऊ राजेंद्र बाजीराव जोशी,पुतण्या शुभम राजेंद्र जोशी आदींनी आपल्या सहकाराच्या मदतीने अडवली असल्याचा आरोप केला आहे.त्यांना लोखंडी रॉड,स्टंप आदीच्या साहाय्याने गंभीर मारहाण केली आहे.त्यांना अन्य आरोपी मयुर संजय सुपेकर,अजय छबुराव सुपेकर,अजिंक्य गणेश काकडे,निलेश बापुराव काकडे,राहुल सतिष काकडे,संजय उर्फ भैय्या सुपेकर,अनिल उर्फ पिंटु गंगावणे,विजय छबु सुपेकर,उमेश साईनाथ गोर्डे,गोरख विलास सुपेकर,दर्शन संजय पवार,अभय राजेंद्र पवार,प्रतिक राजेंद्र धुमाळ,अनिल दत्तु सुपेरकर, सतिष बाबराव काकडे,ओमकार नाना गोडे,बाळु दिरथनाथ गोर्डे,अक्षय मिनानाथ आंग्रे व इतर १५ ते २० लोकांनी मदत केली असल्याचा आरोप केला आहे.

  

दरम्यान रात्री अटक केलेल्या १६ आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी आज अटक करून कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सौ.केळकर यांच्यासमोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपींना ०६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता शैलेश देसले यांनी काम पाहिले तर आरोपींच्या बाजूने ॲड.जयंत जोशी,सहाय्यक वकील ॲड.मोरे,ॲड.शिंदे आदींनी काम पाहिले आहे.

  दरम्यान यातील फिर्यादीत गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे गंठण पळवून नेल्याची आरोप केला आहे.त्यांना सोडविण्यासाठी आलेले फिर्यादीचा भाऊ सूरज कैलास आव्हाड,आत्याचा मुलगा अविनाश गीते,माझा गौरव मोरे,चुलते संदीप विनायक आव्हाड असे आले असता त्यांना अरुण जोशी याने क्रिकेटच्या स्टंपने मारून जखमी केल्याचा आरोप केला आहे.त्यानंतर अक्षय मिनानाथ आंग्रे यांनी आपल्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी लंपास केल्याचा आरोप केला आहे.त्यानंतर तुफान दगडफेक केली असल्याचा आरोप आहे.त्यात अनेक जण जायबंदी झाले असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे.

उपचारा नंतर पोलीस कर्मचारी.

   दरम्यान दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी सुनील योगेश गाडे (वय-१९) हा मोहिनीराजनगर येथील रहिवासी असून त्याने खंडोबा मंदिराच्या जवळून आपल्या वरील क्रमांकाच्या  ब्रीझा कारने घरी जात असताना आरोपी अरुण जोशी,त्यांचा भाऊ राजेंद्र जोशी,त्याचा पुतण्या शुभम जोशी आदींनी गैर कायद्याची मंडळी जमवून गाडी अडवून तू इकडून कसा काय आला असा जाबसाला केला व रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का ? अशी तिखट भाषेत विचारणा केली असल्याचा आरोप केला आहे व वरील हत्याराने आपल्याला व आपल्या आई हिराबाई,बहीण आरती व योगिता पाटणकर अशाना जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली असल्याचा आरोप आहे.

   दरम्यान घटनास्थळी दगड गोटे,विटा,आदींचा खच पडलेला दिसत होता.पोलिस उशिरा आले आणि आपल्यालाच थांबवत असल्याचा राग येऊन सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवला असल्याची गंभीर घटना घडली आहे.त्यात यमानाजी सुंबे व द्यानेश्वर भांगरे हे दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे.ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

   दरम्यान आपल्या आईच्या गळ्यातील एक तोळे वजनाची सोन्याचे गंठण हे मयुर संजय सुपेकर हा तोडून पळून गेला असल्याचा आरोप केला आहे.आपल्या सोडविण्यासाठी आपला भाऊ सूरज आव्हाड,अविनाश आव्हाड,माझा मोरे,माझे चुलते संदीप आव्हाड आदी आले असता सूरज आव्हाड यास अरुण जोशी याने जीव मारण्याची धमकी देऊन हातातील स्टंपने कपाळावर मारून गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद दिली आहे.त्यांना सोनु कैलास आव्हाड,शुभम आढाव,सागर पंडोरे,अनिल उर्फ कालु अवधुत शिंदे,कैलास आव्हाड,विनायक आव्हाड,दत्तु पंडोरे,आप्पा विनायक आव्हाड,अनुप उर्फ आन्या विनायक आव्हाड,रोहीत माळी किरण आव्हाड,अविनाश गिते,मोहन चव्हाण,गणेश चव्हाण, नितीन घुगे,सचिन साहेबराव घुगे,सागर संजय मोरे,संदीप माधवराव देवरे,सचिन हंसराज आढावशाम नारायण झुरळे,प्रविण दत्तु पंडोरे,नितीन आमरे व इतर सर्व रा.कोपरगाव आदींनी साथ दिली असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान या बाबतची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती,कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार,पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने दिपक रोठे आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

दरम्यान पोलिसांनी आज एकूण जवळपास ४१आरोपी पैकी १६ जणांना अटक केली असून आज कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे हे करीत आहेत.

—————————————————————–

  तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला रोज पोहच बातम्या पाठवणे अवघड होत असल्याने आपल्याला रोज ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी खालील लिंक वर जावून न्यूजसेवा ग्रुपला जॉइन व्हा.

*नियमित विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा’ वर क्लिक करा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*
https://bit.ly/newsseva2024
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close