गुन्हे विषयक
तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी,गुन्हा दाखल!

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड ग्रामपंचायत हद्दीत सातचारी नजीकच्या शिलेदार वस्तीवर काल रात्री कधीतरी पाळत ठेऊन असणाऱ्या चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील कपाटाची उचकपाचक करून घरातील ४५ हजारांची रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद भरत बबन शिलेदार (वय – ४३) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केल्याने देर्डे चांदवड आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

फिर्यादी भरत शिलेदार आणि त्यांच्या कुटुंबातील सदय काल दुपारी बाहेर गावाहून घरी आल्यावर काल दुपारी १२.३० वाजता चोरट्यांचा हा प्रताप लक्षात आला होता.त्यांनी तत्काळ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुक्यात ड्रोनद्वारे निरीक्षण करून चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढत आहे.जवळके, बहादरपूर आणि परिसरात अनेक वेळा संशयित ड्रोन आढळले आहे. शिर्डी पोलिस येण्याच्या आधी हे ड्रोन आश्चर्यकारकरित्या गायब होत आहे.श्रीरामपूर येथील अतिरिक्य पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी याबाबत नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे.मात्र रहस्यमरित्या येणारे हे ड्रोन पोलिस पोहचण्याआधी गायब होताना दिसत आहे.त्यातच या काळात चोऱ्यांचे प्रमाण आणि आलेख वाढताना दिसत आहे.त्यामुळे ग्रामस्थ चिंतेत असताना दिसत आहे.असाच अनुभव देर्डे चांदवड हद्दीतील रहिवासी भरत शिलेदार यांना आला आहे.ते दिनाक २४ ऑगस्ट रोजी आपल्या काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.हि बाब हेरून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर पाळत ठेऊन रात्रीच्या सुमारास कधीतरी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट आणि तत्सम वस्तूंची उचकपाचक करून घरातील ४५ हजारांच्या रकमेचा पोबारा केला आहे.
फिर्यादी भरत शिलेदार आणि त्यांच्या कुटुंबातील सदय काल दुपारी बाहेर गावाहून घरी आल्यावर काल दुपारी १२.३० वाजता चोरट्यांचा हा प्रताप लक्षात आला होता.त्यांनी तत्काळ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी धाव घेऊन स्थळपंचनामा केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२४३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम३०५(अ)३३१(३),३३१(४) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल एम.बी.दहिफळे हे करीत आहेत.