गुन्हे विषयक
दोन गटात तुंबळ हाणामारी,दोन जखमी !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीत सोमैया कारखान्याच्या समोर रस्त्यावर आज दुपारी २.३० ते ०३ वाजेच्या सुमारास वाळू आणि ठेक्याशी संबंधित दोन गटात तुफान हाणामारी झाली असून त्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे तर त्याचे पिताश्री किरकोळ जखमी झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यातील जखमीस मुंबई-नागपूर महामार्गावरील रस्त्यालगत असलेल्या रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपऱगाव तालुका पोलिसाशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला आहे.मात्र उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,कोकमठाण येथील जखमी बाप लेकांनी आणि वारी येथील चुलत सासरे आदींनी मायगाव देवी येथील वाळूचा ठेका घेतला होता.या खेरीज मध्य रेल्वेचा संयुक्त ठेका घेतला असल्याची माहिती आहे.त्यांची बरीच कोटींची उड्डाणे झाली आहे.त्यातील काही कोटींची रक्कम वारी येथील चुलत सासरे यांचेकडून घेणे आहे.त्यातच जावयाचे काही काँक्रिटच्या कामाचे सेंट्रिंग मटेरियल आणण्यासाठी कोपरगाव येथे तात्पुरते रहिवासी असलेले जावई आणि त्यांचे वडील आज दुपारी २.३० बाजेच्या दरम्यान आपले वाहन घेऊन चुलत सासऱ्यांच्या वस्तीवर गेले होते.त्यावेळी सेंट्रिंगच्या सामानाची मागणी जावई आपल्या पित्यासमोर केली असताना त्यावेळी चुलत मेहुण्यांने संबंधित कामाच्या पैशाची मागणी केली त्यावेळी आधी त्यांच्यात शिवीगाळ आणि त्याचे रूपांतर अर्वाच्च शिवीगाळीत झाले.नंतर तेथील चुलत सासरे आणि त्यांचे चिरंजीवांनी आपल्या जावयावर थेट कुऱ्हाड सदृश हत्याराने हल्ला चढवला आहे.त्यात त्यांनी आपल्या जावयाच्या वडिलांना म्हणजेच व्याह्यांना खुर्चीस बांधून ठेवण्याचा प्रताप केला होता.

दरम्यान यात मुळ कोकमठाण येथील बाप आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहे.त्यांना पुणतांबा चौफुली नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे.त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
दरम्यान ही हाणामारीची घटना तेथे उपस्थित मजुराने शेतात काम करत असलेले सख्खे सासरे आणि सख्खे मेहुणे यांना पळतपळत जाऊन सांगितली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी जावयास आणि व्याह्यास पाहून आपल्या सख्ख्या भावाचा बेत पाहिला आहे.त्यात तेही जखमी झाले आहे.त्यांनी नंतर तेथे असलेल्या दोन्ही गटाच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली आहे.दरम्यान आज वारी येथील आठवडे बाजार असल्याने या ठिकाणी सोमैया या कंपनीच्या समोर बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.
त्यात मुळ कोकमठाण येथील बाप आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहे.त्यांना पुणतांबा चौफुली नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे.त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपऱगाव तालुका पोलिसाशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले होते.