जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ऑटोमोबाईलचे दुकान फोडले,कोपरगावात गुन्हा !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


  कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरेगाव येथील श्रीधर दत्तू कदम यांचे मालकीचे दिपक हार्डवेअर ॲन्ड ऑटोमोबाईल हे दुकानाचे कुलूप तोडून काल रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यातील ०४ हजारांची रोख रक्कम व १९ हजार ८०० रुपये किमतीचे विविध कंपन्याचे ऑईलचे पॅकिंग डबे असा २३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा गुन्हा फिर्यादी यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केल्याने सुरेगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी श्रीधर कदम हे आपले दुकान बंद करून आपल्या घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचेवर पाळत ठेऊन रात्री कधीतरी सदर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानात आत प्रवेश करून त्यातील ०४ हजारांची रोख रक्कम तसेच व्हिडोल, कॅस्ट्रोल कंपनीचे डबे व रोख रक्कम असा २३ हजार ८०० रुपयांचा डल्ला मारला आहे.

  कोपरगाव तालुका चोरट्यांना सुरक्षित आश्रयस्थान बनले असल्याचे विविध घटनांवरून दिसून येत असून तालुक्यात अनेक दाखल होत असलेले गुन्हे हे त्याची साक्ष ठरत आहेत.अशीच घटना काल रविवार दिनांक २७ जुलै रोजी रात्री ०७ नंतर फिर्यादी श्रीधर कदम हे आपले दुकान बंद करून आपल्या घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचेवर पाळत ठेऊन रात्री कधीतरी सदर दुकानाचे शटर चे कुलूप तोडून दुकानात आत प्रवेश करून त्यातील ०४ हजारांची रोख रक्कम तसेच व्हिडोल कंपनीचे १०,०५,०३,०१ लिटर क्षमतेचे विविध ३१ डब्बे,बादल्या तर ३.५०, व ०१ लिटर क्षमतेचे ०८ डब्बे ०४ हजार १०० रुपये किमतीचे डब्बे असे एकूण २३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

  संबंधित दुकानदार सकाळी आपले दुकान उघडण्यासाठी सकाळी ०८ वाजता आले असता हा चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला आहे.त्यांनी याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली असून घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.


  दरम्यान कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.२१८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(१),३३१(४),३०५(अ) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल एम.बी.दहिफळे करीत आहेत.

   दरम्यान या घटनेने सुरेगाव,कोळपेवाडी परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close