जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…’त्या’ गुन्ह्यातील एक आरोपी जेरबंद,तीन फरार!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरात २३ जुलैच्या रात्री गोरोबानगर गणपती मंदिराजवळ दोन गटात घडलेल्या हाणामारीत शहर पोलिसांनी अखेर काल दुपारी ३.११ वाजता गुन्हा दाखल केला असून यात आरोपी सागर उर्फ मोद्या मंजुळ,अतुल आव्हाड,आकाश मंजुळ,व एक अज्ञात सडपातळ दाढी कोरलेला पांढरा शर्ट घातलेला गोरा मुलगा अशा चार जणांवर मोहिनीनगर येथील फिर्यादी सागर किसन पंडोरे (वय-२७) याने गुन्हा दाखल केला आहे.

  यातील एक आरोपी अतुल आव्हाड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.त्याच्या तोंडून चौथा आरोपी नेमका कोण होता हे निष्पन्न होणार आहे.

   याबाबतचे सविस्तर वृत् असे की,बुधवार दि.२३ जुलैच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास फिर्यादी सागर पंडोरे व त्याचा कुत्र्यावर उपचार करणारा एक सहकारी हे गोरोबानगर या उपनगरात गेले असताना
आरोपी सागर मंजुळ त्यास म्हणाला की,”तुझ्यात एवढी हिंमत आली का ? तु आमचे गल्लीत चांगले चांगले भाई फिरत नसताना तू आमच्या गल्लीत कसा फिरत आहे” असे म्हणुन आरोपी यांनी फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने फरसी डोक्यात मारुन लोखंडी दांडके व लाकडी दांड्याने मारहाण करुन फिर्यादी व साक्षीदार यांचे मोबाईल व साक्षीदार य दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरुन नेली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

   दरम्यान या हल्ल्यात फिर्यादी सागर पंडोरे हा गंभीर जखमी झाला आहे.त्याचेवर कोपरगाव नजीकच्या एस.जे.एस.हॉस्पीटल उपचार सुरू आहे.त्याच्या दवाखान्यातील दिलेल्या जबाबावरुन कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३१०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१),११८(१),११८(२),११९(१),११५(२),३(५) प्रमाणे वरील चार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.


   यातील एक आरोपी अतुल आव्हाड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.त्याच्या तोंडून चौथा आरोपी नेमका कोण होता हे निष्पन्न होणार आहे.

  दरम्यान या घटनेत एक हद्दपार आरोपी आल्याची शहरात वाच्यता झाली असल्याने पोलिस तपासात या गुन्ह्यात तो सामील होता की नाही ते उघड होणार आहे.त्यातून शहर पोलिसांना पुढील तपास करणे सोयीचे होणार आहे.

  दरम्यान या गुन्ह्यात फिर्यादी याने आपला साक्षीदार ऋषिकेश आव्हाड यांची ५० हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची साखळी,१२ हजार रुपये किमतीचा सॅमसंग अल्ट्राय २३ भ्रमणध्वनी तर फिर्यादीचा ०६ हजार रुपये किमतीचा एक जुना भ्रमणध्वनी असा ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

  दरम्यान पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने हे करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close