गुन्हे विषयक
शहरात दोन गटात कोयत्याने हाणामारी,हद्दपार गुंडाची हजेरी !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात काल रात्री ११.३० बाजेच्या सुमारास गोरोबानगर पाण्याच्या टाकीजवळ दोन गटात झालेल्या हाणामारीत कोयत्याचा व लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला असून यात मागील पंधरवड्यात एका हद्दपार शेख नावाच्या गुंडाने कोयत्याचा वार केल्याने त्यात सागर हरिभाऊ पंडोरे (वय-२६) रा.मोहिनीराजनगर हा डोक्यावर गंभीर स्वरूपाचा कोयत्याचा वार झाल्याने जखमी झाला असून त्यास कोपरगाव नजीकच्या संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आता टोळ्यांच्या तडाख्यात सापडले असल्याची चर्चा नागरिकांत सुरू झाली आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”सदर फिर्यादी आपल्या फिर्यादी आरोपीस ओळखू शकलेला नाही त्यामुळे फिर्यादी आरोपीचे जसे वर्णन करील त्या प्रमाणे गुन्हा दाखल करून आम्ही तपास करून आरोपी निष्पन्न झाल्यास त्याविरुद्ध गुन्हा केला जाईल असे आश्वासित केले आहे.
कोपरगाव शहरातील नव्याने दाखल झालेले पोलिस अधिकारी रामकृष्ण कुंभार यांनी येथील कार्यभार हाती घेतल्यावर शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत होतील अशी आशा निर्माण झाली असताना त्याला या घटनेने छेद गेला आहे.कोपरगाव शहरात गोदावरी नदीजवळ स्वामी समर्थ मंदिराजवळ एप्रिल महिन्यात खुलेआम दोन टोळ्यांनी एकमेकावर सिनेस्टाईल गोळीबार केल्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.त्यानंतर सचिन वॉच कंपनी या दुकानावर भल्या पहाटे चादर गँगने ३० लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्यावर पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.त्यांनी काही दिवसात सदरचा माल व आरोपी नेपाळच्या सीमारेश्वरून जप्त केला होता.मात्र त्यातील काही आरोपी नेपाळमध्ये पळून जाण्यात यशस्वी झाले होते.काकडी विमानतळावर चोरीसाठी झालेले पितापुत्र आणि आईचा खून झाला होता.त्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांनी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोपरगाव शहरातील एक नामचीन आरोपी शेख यास हद्दपार केले आहे.मात्र तो रात्रीच्या गुन्ह्यात सामील असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.कोयत्याचा वार त्यानेच जखमी तरुण सागर पंडोरे याच्यावर केल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे या आरोपीवर तो सत्ताधारी गटाचा असल्यायाने त्याला पोलिसांचे सुरक्षा कवच प्राप्त होत असल्याचा आरोप सातत्याने होत आला आहे.त्यामुळे आजच्या गुन्ह्यात याची पुनरावृत्ती होणार की,हद्दपार गुंड शहरात आला याबाबत झाकेडाल होणार की पोलिस कडक कारवाई करणार ? याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान या हाणामारीत मोहिनीराज नगर येथील तरुण ऋषी आव्हाड याचा एक ॲपल कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल,दोन तोळ्याची सोन्याची चेन,गेली असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थळपंचनामा केला असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”सदर फिर्यादी आपल्या फिर्यादी आरोपीस ओळखू शकलेला नाही त्यामुळे फिर्यादी आरोपीचे जसे वर्णन करील त्या प्रमाणे गुन्हा दाखल करून आम्ही तपास करून आरोपी निष्पन्न झाल्यास त्याविरुद्ध गुन्हा केला जाईल असे आश्वासित केले आहे.
तथापि नुकत्याच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार सदर आरोपी आज दुपारी ०१.१० वाजता बसस्थानकात असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.याबाबत कोपरगाव शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.