गुन्हे विषयक
वाळूचोरांविरुद्ध मोठी कारवाई,०७ जणांवर गुन्हा!

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील गोदावरी नदी पात्रामध्ये पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून,बेकायदा वाळू उपसा, विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध वाहतूक करणारे ४ डंपर व १ ट्रॅक्टर अशी ५५ लाख ५० हजार रुपये किमतीची वाहने जप्त करून ०७ जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नगर जिल्हा पोलिस विशेष पथकाचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई ,बुधवारी केली आहे.पथकाने छापा टाकताच,चाहूल लागल्याने वाळू उपसा करणारे वाहनासह पळून जाऊ लागले.पथकाने पाठलाग करून ४ डंपर व १ ट्रॅक्टर जप्त करून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुक्यातील वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील वाळूस सोन्याचे भाव मिळत असल्याने त्यावर दरोडा टाकणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यात महसूल आणि स्थानिक पोलिसांची मिलीभगत असल्याने शिवाय त्यास राजकीय पाठबळ मिळत असल्याने वाळू ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली आहे.मात्र वाळूचोर ही कोंबडीच खाण्यास प्रवृत्त झाले असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना नुकतीच उघडकीस आली आहे.त्यात जप्त मुद्देमाल डोळे विस्फारून टाकणारा असल्याचे उघड झाले आहे.
त्यातील आरोपींची नावे उघड झाली असून त्यात अर्जुन भाऊसाहेब गुरुळे (वय ३०), संतोष लक्ष्मण ठमके (वय ३०, दोघे रा. मुर्शदपूर, कोपरगाव),अर्जुन भाऊसाहेब गुरुळे, गणपत पंडित पवार (वय-२७, रा.पारेगाव,येवला,नाशिक),अमोल वसंत मांडगे (फरार,रा.कोपरगाव),अमोल लक्ष्मण इंगळे (वय ३१,रा.मळेगाव थडी, कोपरगाव), राम कुंदलके (फरार, रा. कोळपेवाडी,कोपरगाव),अजय शेळके (फरार रा. कोपरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नियुक्त केलेल्या विशेष पथकाचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई ,बुधवारी केली आहे.पथकाने छापा टाकताच,चाहूल लागल्याने वाळू उपसा करणारे वाहनासह पळून जाऊ लागले.पथकाने पाठलाग करून ४ डंपर व १ ट्रॅक्टर जप्त करून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दरम्यान हे विशेष पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर छापे टाकून कारवाई करीत आहे.मात्र कारवाई करताना पथकाकडून दुजाभाव होत असल्याचे दिसत असल्याचा आरोप होत आहे.