गुन्हे विषयक
दोन गटात मारहाण,सात जखमी,सहा जणांवर गुन्हा!

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरंगाव शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात व शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ज्ञानेश्वरनगर येथे आज दुपारी ०२.२१ वाजेच्या सुमारास दोन गटात काठीने झालेल्या तुंबळ हाणामारीत सात जण जखमी झाले असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे.या प्रकरणी आदेश संजय संवत्सरकर,त्याचा भाऊ किरण संवत्सरकर,अमोल विठ्ठल संवत्सरकर,भूषण दिनकर संवत्सरकर,मोतीराम सीताराम संवत्सरकर,भगवान सीताराम संवत्सरकर आदी सहा जणांविरुद्ध फिर्यादी समाधान अंकुश कुऱ्हे यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव सह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या भांडणाच्या मुळाशी गेले असता यातील फिर्यादीचा चुलत पुतण्या संग्राम कुऱ्हे यास सारिका संजय संवत्सरकर हिने काठीने मारहाण केली होती त्यातून त्यांनी चिडून जाऊन हे कृत्य केले असल्याची माहिती हाती आली आहे.याबाबत शिंगणापूर आणि परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
कोपरगाव तालुक्यात मारहाणी आणि चोऱ्यामाऱ्या,अपघात आदी घटनांत मोठी वाढ होताना दिसत आहे.अशीच घटना आज दुपारी ०२ वाजेच्या सुमारास शिंगणापूर हद्दीतील ज्ञानेश्वर नगर हद्दीत घडली असून फिर्यादी इसम समाधान कुऱ्हे याचे चुलतभावाचे मुलास आरोपी आदेश संवत्सरकर याने मारहाण केली होतो.त्याचा जाब विचारण्यास फिर्यादी गेला असता वरील आरोपीनी फिर्यादीचा चुलतभाऊ विकास उऱ्हे,कैलास उऱ्हे,राहुल उऱ्हे,गोरख उऱ्हे,व त्याची भावजयी शीतल उऱ्हे,बहीण दिपाली ढोकरट आदींना हातातील काठीने मारहाण केली आहे त्यात वरील सहा जणांना मारहाण केली आहे.
दरम्यान या भांडणाच्या मुळाशी गेले असता यातील फिर्यादीच्या चुलतभावाच्या मुलाने आरोपीच्या एका जेष्ठ व्यक्तीस मारहाण केली होती त्यातून त्यांनी चिडून जाऊन हे कृत्य केले असल्याची माहिती हाती आली आहे.याबाबत शिंगणापूर आणि परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,पोलीस उपनीरिक्षक एस.एस.सोंने यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-३७३/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ११८(१),११५(२),३५२,३५१,(३),१८९(२),१९१(१),१९२(२),१९० प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान पुढील तपास पोलिस रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.जालिंदर तमनर हे करीत आहेत.