गुन्हे विषयक
अवैध व्यवसायांवर धाडी,सत्ताधारी माजी नगरसेवकांसह सहा जणांवर गुन्हा !

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या बातम्या अनेक दिवसापासून येत असताना स्थानिक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची बाब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने काल पर्याविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक संतोष सिद्धप्पा चवंडके यांचेसह शंकर पंडित वाणी,रवींद्र कारभारी ढोके,गणेश अंबादास लाकारे,स्वप्नील रमेश घुमरे,इस्माईल आमिन शेख आदी सहा जणांवर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने अवैध व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.

दरम्यान कोपरगाव शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध सावकारी सुरू असून त्यातून अनेक गुन्हे घडत आहे.यातील ताजे उदाहरण म्हणून गांधीनगर येथे झालेले पहाटे तीन वाजता हाणामारी समजली जात आहे.यात अनेक तरुण यात बळी जात असून त्यातून ते घरफोड्या आणि चोऱ्यांकडे वळत आहे तर अनेक जण आत्महत्या करत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.शिवाय अवैध रेशन घोटाळा अद्याप थांबलेला नसल्याची माहिती मिळत आहे.
कोपरगाव शहरात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे.या शिवाय लहान मोठया चोऱ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.शहरात मध्यवस्तीत सचिन वॉच या दुकानाची तीस लाखांची चोरी झाली होती यातील आरोपी पकडले असले तरी शिर्डी विमानतळाजवळ एप्रिल महिन्यात तीन खून झाले आहे.त्या आरोपींना सहा सात तासात अटक केली होती.मात्र त्यानंतर गुन्हे कमी झाल्याचे दिसून आलेले नाही.देरडे-चांदवड या ठिकाणी खाजगी तारतंत्रीचा खून झाला होता त्याचा अद्याप तपास लागलेला नाही.अवैध व्यवसाय तर विचारू नका.याबाबत वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी दाखल घेतली असून त्यासाठी पर्यवेक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या पथकाने काल सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास जेऊर पाटोदा शिवारात सुरू असलेल्या कल्याण मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकली असून त्यात अनेक बड्या हस्ती सापडल्या आहेत.त्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक मोहरे अडकले असून त्यात माजी नगरसेवक संतोष सिध्पपा चवंडके (वय -४९),यांचेसह शंकर पंडित वाणी,(वय -५९),दोघे जेऊर पाटोदा,रवींद्र कारभारी ढोक,(वय -६०), रा.लक्ष्मीनगर,गणेश अंबादास लकारे,(वय -४६),कहार गल्ली,कोपरगाव,स्वप्नील रमेश घुमरे,(वय -२४), रा.महादेवनगर,इस्माईल आमिन शेख वय -४९) रा.गांधीनगर आदी सहा जणांवर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार आदींनी भेट दिली आहे.

दरम्यान पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी शहर आणि तालुक्यात आणखी धाडी टाकल्या असून त्याबाबत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे.त्यात सत्ताधारी गटासह कोणाही इसमाचे नाव न वगळण्याची तंबी संबंधित अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान या प्रकरणी घटनास्थळी पोलिसांनी शंकर पंडित यांचे ताब्यातील रोख रक्कम २३ हजार,रवींद्र धोक याचे ताब्यातील रक्कम रुपये १८ हजार,गणेश लकारे याचे ताब्यातील रोख रक्कम ०९ हजार ५००,संतोष चवंडके याचे ताब्यातील रोक रक्कम रुपये ०८ हजार ४५०,स्वप्नील घुगरे याचे ताब्यातील रोख रक्कम ०७ हजार,इस्माईल शेख याचे ताब्यातील रोख रक्कम रुपये ०४ हजार ५००,त्या ठिकाणी असलेल्या आकडे लिहिलेल्या दहा कागदी चिठ्ठ्या,नऊ लाल अक्षरात लिहिलेल्या चिठ्ठ्या याशिवाय २५ हजार रुपये किमतीचा एक ऑरपॅट कंपनीचा कॅलक्युलेटर,१० हजार रुपये किमतीचा एक सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल शंकर पंडित वाणी त्याचे ताब्यात मिळून आला आहे.रवींद्र धोक याचे ताब्यातील ०७ हजार रुपये किमतीचा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल,गणेश लकारे याचे ताब्यातील एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल,१२ हजार रुपये किमतीचा ऑप्पो कंपनीचा एक संतोष चवंडके याचे ताब्यातील एक मोबाईल,१५ हजार रुपये किमतीचा आकाशी रंगाचा विवो कंपनीचा स्वप्नील घुगरें यांच्या ताब्यातील मोबाईल,९० हजार रूपये किमतीची एक होंडा युनिकॉर्न गाडी,(क्रं.एम.एच.१७ सी.झेड.२७००),४० हजार रुपये किमतीची एक आकाशी रंगाची ज्युपिटर गाडी,क्रं.एम.एच.१७ सी.जे.६२७२),३० हजार रुपये किमतीची चॉकलेटी रंगाची ज्युपिटर गाडी क्रं.एम.एच.१७ बी.आर.७७१२)असा एकूण ०२ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी पो.को.गणेश वशिष्ठ काकडे यांनी क्रं.३५१/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.काँ.के.ए.जाधव हे करत आहेत.
दरम्यान आणखी एका घटनेत संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर शिंगणापूर हद्दीत टपरीचे आडोशाला जुगार खेळताना गणेश साहेबराव गर्जे (वय -४६) रा.येली तालुका पाथर्डी याचे विरुध्द सायंकाळी ३.५५ वाजता वीणा परवाना लोकांकडून कल्याण नावाचा मटका खेळताना व खेळविताना आढळून आल्याने त्याचे विरुध्द गुन्हा दाखल केला असल्याची खबर आहे.त्याचे विरुध्द पो.कॉ.गणेश काकडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या शिवाय साईबाबा कॉर्नर,साई मंदिराचे पाठीमागे आडोशाला दुपारी ०३ वाजेच्या सुमारास सावळीविहीर येथील आरोपी या ठिकाणी दशरथ तुकाराम म्हस्के (वय-३१) हा सिगारेट मधील तंबाखू तळहातावर घेऊन त्यामध्ये पाला-फुले असलेला हिरव्या रंगाचा पदार्थ मिसळून रगडून गांजा या अमली पदार्थाचे मिश्रण चिनी मातीच्या चीलमीमध्ये भरून आगपेटीच्या सहाय्याने पेटवून सफेद रंगाचा कापड लावून झुरके घेताना आढळून आला आहे.त्याचे विरुध्द फिर्यादी पो.काँ.दिगंबर जयसिंग शेलार यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगावातील बेकायदेशीर सावकारीने भयानक स्वरूप धारण केले असून त्यातील अनेकजण राजकीय पक्षाचा वापर करून अव्वाच्या सव्वा दराने म्हणजे प्रतिमाह शेकडा १५ ते २० टक्के दराने दादागिरीने वसुली करत असल्याची बातमी आहे.या वसुली दादांच्या दहशतीमुळे त्यांच्या कुणी विरोधात बोलू शकत नाही.गरजू लोक यांचेकडून व्याजाने पैसे घेतात.कितीतरी पट पैसे देऊनही कर्ज वसूल होत नाही.त्यापोटी अनेकांचे प्लॉट,घरेही ताब्यात घेवून पुन्हा परत देत नाहीत.
अवैध सावकारीने घेतले उग्ररूप!
दरम्यान कोपरगावातील बेकायदेशीर सावकारीने भयानक स्वरूप धारण केले असून त्यातील अनेकजण राजकीय पक्षाचा वापर करून अव्वाच्या सव्वा दराने म्हणजे प्रतिमाह शेकडा १५ ते २० टक्के दराने दादागिरीने वसुली करत असल्याची बातमी आहे.या वसुली दादांच्या दहशतीमुळे त्यांच्या कुणी विरोधात बोलू शकत नाही.गरजू लोक यांचेकडून व्याजाने पैसे घेतात.कितीतरी पट पैसे देऊनही कर्ज वसूल होत नाही.त्यापोटी अनेकांचे प्लॉट,घरेही ताब्यात घेवून पुन्हा परत देत नाहीत.या गोरख धंद्यातील दादांनी
अनेक युवक यात सामील करून
घेतले आहेत.विशेष म्हणजे हीच मंडळी पक्षाचे पदाधिकारीही झाले आहे.त्या अवैध सावकारी पैशातूनच फ्लेक्स,वाढदिवसाच्या पार्ट्या, ढाब्यावर गोंधळ, हाणामाऱ्या,गुंडागिरी मोठ्या प्रमाणावर शहरात सुरू आहे.याबाबत कोणी आवाज उठवणार आहे असा सवाल नागरिक करत आहेत.
बातमी अद्यावतीकरण सुरू आहे…..