जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग,पोस्कोचा गुन्हा दाखल !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मतिमंद अल्पवयीन मुलीचा नुकताच कॅडबरी आणि चॉकलेटचे आमिष दाखवून तिचा विनयभंग करून नाव सांगितले तर जीवे मारण्याची धकमी दिल्या प्रकरणी यातील आरोपी साईनाथ पगारे याचे विरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

या आरोपीने अल्पवयीन मुलीस उपनगराच्या काटवणात नेऊन घेऊन जावून तिच्याशी असभ्य वर्तन केले होते व याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी आरोपी साईनाथ पगारे यांने दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

   कायदेशीर प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्येक टप्प्यावर मुलांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक हल्ले,लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरता लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा-२०१२ तयार करण्यात आला आहे.हा कायदा तयार करताना बालक प्रथम या तत्त्वाचा अंगीकार करण्यात आला.यामध्ये मुलांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने अहवाल देणे,पुराव्याची नोंद करणे आणि खास नेमण्यात आलेल्या विशेष न्यायालयांच्या मार्फत जलद गतीने खटले चालवणे याचा समावेश करण्यात आला आहे.या नवीन कायद्याद्वारे विविध प्रकारच्या गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना शिक्षा करता येईल,अशी तरतूद करण्यात आलेली आहे.मात्र तरीही असे गुन्हे राज्यात कमी होण्याची चिन्हे दिसत नाही.अशीच घटना नूकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली आहे.यातील आरोपी साईनाथ पगारे यास पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ अटक केली आहे.सदर अल्पवयीन मुलगी मतिमंद असल्याचे कळते.तिला धारणगाव रोडलगत असलेल्या उपनगराच्या काटवणात घेऊन जावून तिच्याशी असभ्य वर्तन केले होते व याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी आरोपी साईनाथ पगारे यांने दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.मात्र या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.त्याचा शोध पोलिस घेत आहेत.या कारवाईबाबत शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.

  दरम्यान या प्रकरणी सदर मुलीच्या नातेवाईक महिलेने कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२६६/२०२५ भारतीय दंड संहिता सन-२०२३ चे कलम ७५(१),७८(१),३५१(३)व  सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम २०१२ चे कलम १२ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  दरम्यान घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचेसह सहाय्यक पोलीस पोलिस निरीक्षक किशोर पवार,पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे आदींनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उप निरीक्षक दीपक रोठे हे करीत आहेत.

   दरम्यान या प्रकरणी सदर मुलीच्या नातेवाईक महिलेने कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२६६/२०२५ भारतीय दंड संहिता सन-२०२३ चे कलम ७५(१),७८(१),३५१(३)व  सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम २०१२ चे कलम १२ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close