जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चाकूने मारहाण,सहा जणांवर गुन्हा !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव हद्दीत रहिवासी असलेल्या आपल्या सासू सासऱ्यास मारहाण करता याचा जबसाल केला असता आरोपी रोहित विजय गायकवाड,राहूल विजय गायकवाड,कविता राहुल गायकवाड,आम्रपाली रोहित गायकवाड,मनोज मार्कस गायकवाड,माया मनोज गायकवाड आदींनी लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केल्याचा गुन्हा फिर्यादी महेश केशव निकम (वय-३४) रा.दत्त मंदिराजवळ सुरेगाव यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी हे फिर्यादी यांचे सासू आणि सासरे यांचेशी वाद घालत होते.फिर्यादी यांची पत्नी ही आरोपींना समजावून सांगत असताना वरील आरोपी हे बेकायदा जमा झाले व त्यातील आरोपी राहुल गायकवाड याने फिर्यादी महेश निकम यांस चाकूने रोहित गायकवाड याचे हातावर मारहाण केली असल्याचा गुन्हा सहा जणांवर दखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी इसम हे सुरेगाव येथील रहिवासी आहे.त्यांचे सासू आणि सासरे त्याच गावात आहेत.दि.१७ जून २०२५ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी हे दिलीप आनंदा जगातप यांचे घराचे समोर असताना त्यांना वरील आरोपी हे त्यांच्या सासू आणि सासरे यांचेशी वाद घालत होते.फिर्यादी यांची पत्नी ही आरोपींना समजावून सांगत असताना वरील आरोपी हे बेकायदा जमा झाले व त्यातील आरोपी राहुल गायकवाड याने फिर्यादी महेश निकम यांस चाकूने रोहित गायकवाड याचे हातावर मारहाण केली होती तर आरोपी कविता राहुल गायकवाड,आम्रपाली रोहित गायकवाड व माया गायकवाड आदींनी फिर्यादिस शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती.शिवाय आम्रपाली गायकवाड हीने सुद्धा फिर्यादी महेश निकम यांना शिवीगाळ केली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे.

  या प्रकरणी फिर्यादी यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१८२/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३चे कलम ११८(१),११५(२),३५२,३५१,(२),(३),१८९,(२),१९१(३),१९० प्रमाणे वरील आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस हे.कॉ.एम.बी.दहिफळे आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.दहिफळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close