जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

… या शहरात चोरट्यांची नवीन अधिकाऱ्यांना सलामी !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
  
   कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून रामकृष्ण कुंभार हे भगवान मथुरे यांचे जागी रुजू झाले असताना व त्यांनी अवैध व्यवसाय आणि शहरातील बेशिस्त वाहन धारकांना वठणीवर आणण्याचा काम सुरू केले असताना काल त्यांना कोपरगाव बस स्थानकातून खिसे कापू व्यवसाय करणाऱ्या काही चोरट्यांनी सुमारे दोन महिलांच्या पर्समधील विविध दागिन्यांसह सुमारे ३६ हजार रुपयांना ऐवज लंपास करून सलामी दिली असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या नाशिक येथे जाणाऱ्या बसमध्ये श्रीकांत भगवान बाविस्कर हे आपली पत्नी शुभांगी बाविस्कर आणि दोन मुले असे प्रवास करण्यासाठी जात असताना दहा हजार रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे मणी मंगळ सूत्र असा दहा हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

  कोपरगाव शहर आणि तालुक्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.याबाबत विविध माध्यमातून अनेक बातम्या प्रसिध्दी होत असताना त्यातले त्यात सचिन वॉच मधील तीस लाखांची चोरी,काकडी विमानतळ येथील तीन खून खूपच चर्चेत आले होते.किरकोळ गुन्हे तर विचारू नका अशी स्थिती असताना कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात शिर्डीतील कर्जत येथे रवाना झालेले पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची पुन्हा एकदा पोलिस अधीक्षक यांनी उत्तर नगर जिल्ह्यात भगवान मथुरे यांचे जागी रवानगी केली आहे.त्यांनी दोन दिवसापूर्वी आपला पदभार सांभाळला कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय आणि बेशिस्त वाहनचालक आदींना वठणीवर आणण्याचे ठरवले असताना त्यांना कोपरगाव बस स्थानकातील चोरट्यांनी नाक खाजवून दाखवले आहे.

   यातील अंजनापुर तालुका कोपरगाव येथील फिर्यादी महिला सविता सुधीर गव्हाणे (वय-२५) यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार त्या आपले माहेर येवला तालुक्यातून अंजनापुर येथे असताना दुपारी ०२ वाजता संगमनेर -कोपरगाव या उभ्या असलेल्या बस मध्ये चढत असताना त्यांनी एका हातात आपले दोन वर्षाचे बाळ हाती घेतले होते.तर आपल्या पाठीवर एक सॅक होती त्या सॅकमध्ये त्यांची एक पर्स होती.त्या चढत असताना वर गेल्यावर एका विद्यार्थीनीने त्यांना तुमची सॅकची चेन उघडी असल्याचे सांगितले होते.त्यांनी त्याची खात्री केली असताना त्यांना आपल्या सॅक मधील पर्स मधील विविध दागिने अज्ञात चोरट्याने लांबवले असल्याचे दिसून आले आहे.त्यात एक सात ग्रॅम वजनाचे कानातले टॉप,दोन ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र,असे वीस हजार रुपयांचे दागिने,शिवाय चांदीची गळ्यातील साखळी त्याची किंमत एक हजार रुपये,एक चार ग्रॅम  वजनाचे शुभांगी बाविस्कर यांचे गळ्यातील मनिमंगळ सूत्र,रोख रक्कम पाच हजार रुपये असा सुमारे ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून घटनास्थळावरून पोबारा केलां आहे.

   दरम्यान शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या नाशिक येथे जाणाऱ्या बसमध्ये श्रीकांत भगवान बाविस्कर हे आपली पत्नी शुभांगी बाविस्कर आणि दोन मुले असे प्रवास करण्यासाठी जात असताना दहा हजार रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे मणी मंगळ सूत्र असा दहा हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-३००/२०२५भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ३०५(बी)प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close