गुन्हे विषयक
महिलेवर अत्याचार,गुन्हा दाखल,आरोपी अटक !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एका ३४ वर्षीय महिलेवर गेली एक वर्षे आरोपी रात्रीच्या सुमारास घरात घुसून शारीरिक अत्याचार करत असून तिच्या सहनशीलतेचा कडेलोट झाल्यावर तिने नुकताच शहाजापूर येथील आरोपी ज्ञानेश्वर जगन मोरे याचे विरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने शाहाजापुर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी ज्ञानेश्वर मोरे याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून व आपल्या घरी येवून आपल्यावर गेले एक वर्षे बळजबरी करून शारीरिक संबंध करत असून तसेच आपल्या घरात लहान मुलगा असून आपण दोघेच राहत आहे.द्यानेश्र्वर मोरे हा रात्री १२ च्या सुमारास आपल्या घरात घुसून तो शारीरिक अत्याचार करत आहे.
गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे,ती पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष नोंद होणाऱ्या तक्रारीवरून जात असली तरी तरी नोंद होणाऱ्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे अंधारात राहणाऱ्या घटनांची संख्या जास्त आहे.खालील आकडेवारीवरून एक नजर टाकली तर स्त्री अत्याचाराचे भीषण वास्तव दिसून येईल.स्त्रियांवरील अन्याय/अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच.या पातळीवर समाधानकारक होत असल्याचे दिसत नाही परिणामी या गुन्ह्यात वारंवार वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना दिनाक ०२ जून २०२५ रोजी उघड झाली आहे.या बाबत बाधित महिलेने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हाच सदर बाधित महिलेने म्हंटले आहे की,आपण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या एक लहान मुलांसह राहत असून आरोपी ज्ञानेश्वर मोरे याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून व आपल्या घरी येवून आपल्यावर गेले एक वर्षे बळजबरी करून शारीरिक संबंध करत असून तसेच आपल्या घरात लहान मुलगा असून आपण दोघेच राहत आहे.द्यानेश्र्वर मोरे हा रात्री १२ च्या सुमारास आपल्या घरात घुसून तो शारीरिक अत्याचार करत आहे.आपण विरोध केला असता तो आपल्याला मारझोड करत आहे.दरम्यान तो आपल्या मुलास जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-१६९/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ३७६ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,महिला पोलिस उपनिरीक्षक व्हि.ए.मुकणे आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुकणे या करीत आहेत.