गुन्हे विषयक
… या ठिकाणी ५.१७ लाखांची चोरी,अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील सचिन वॉच कंपनीच्या तीस लाखांच्या चोरीनंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी आपली हात की चलाखी दाखवली असून संवत्सर हद्दीतील महेश शंकर परजणे (वय -३९) यांच्या मालकीच्या कृषी सेवा केंद्राच्या मागील बाजूने दुकान फोडून आतील ९८ हजार २०० रुपयांची रोख रक्कम व विविध कंपन्याच्या मालकीची बियाणे,औषधे,मोबाईल असा सुमारे ०५ लाख १७ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याने संवत्सर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

काही दिवसापूर्वी संवत्सर ग्रामपंचायतने ग्रामसभेचा ठराव घेऊन पोलिस अधिकाऱ्यांचे उपस्थितीत अवैध व्यवसाय व गुन्हेगारी कमी करण्याची मागणी केली होती.मात्र त्यात या गुन्हेगारीत कमी होण्याऐवजी वाढ होताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.अशीच घटना काल रात्री कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत पोलिसांच्या व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या नाकावर टीचून घडली आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात विविध गुन्हे वाढत असल्याचे वारंवार उघड होत आहे.घरातील लूट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी काकडीतील आई,बाप,आणि अविवाहित मुलाचा असे एकूण तीन बळी घेतले असताना शहरातील मध्यवस्तीत असलेल्या सचिन वॉच या कंपनीतील घड्याळाची भल्या पहाटे ३० लाख रुपयांची लूट केली होती.त्यातील काही आरोपी पकडले आहे तर अद्याप काही आरोपी नेपाळमध्ये फरार झाले आहेत.शहरात आकडे,मटका आदी अवैध व्यवसायाचा महापूर,अवैध वाळूचोरी,गावठी कट्टे,बंद पडलेले रेशन किंवा बंद करण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या नावावर मोठा रेशन घोटाळा,लाच लुचपत विभागाच्या दर दोन महिन्याला पडणाऱ्या धाडी त्यात अडकवणारे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.अशातच समोरासमोर गोळीबाराच्या घटना घडून शहरातील शांतता भंग होण्याच्या घटना वाढल्या असताना आता पुन्हा चोरट्यांनी उचल खाल्ली आहे.काही दिवसापूर्वी संवत्सर ग्रामपंचायतने ग्रामसभेचा ठराव घेऊन पोलिस अधिकाऱ्यांचे उपस्थितीत अवैध व्यवसाय व गुन्हेगारी कमी करण्याची मागणी केली होती.मात्र त्यात या गुन्हेगारीत कमी होण्याऐवजी वाढ होताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.अशीच घटना काल रात्री कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत पोलिसांच्या व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या नाकावर टीचून घडली असून काल रात्री ०९ वाजता फिर्यादी दुकानदार महेश परजणे हे नेहमी प्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले असता व सकाळी नियमित वेळेत ८.३० वाजता दुकान उघडण्यास आले असता त्यांना आपले दुकान मागील बाजूस अज्ञात चोरट्यांनी फोडले असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी याबाबत खबर कोपरगाव शहर पोलीस अधिकाऱ्यांना कळवली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे.
त्यात ९८ हजार २०० रुपयांची रोख रक्कम त्यात ५००,२००,१००,५०,२०,१० रुपये दराच्या नोटासह काही चिल्लर असून १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल,२५ हजार किमतीचे सी.सी. टि .व्हि.चे डी. व्हि.आर.दोन हार्ड डिस्क,०२ हजार रुपये किंमतीचे जिओ फायबर युनिट,त्यात सिम कार्ड (९१२४२३ ७९६००५),०२ लाख ९८ हजार ९०० रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे कीटक नाशक,त्यात कोरोजन चे १०० नग,टक्झेंचे १०० नग, डेलिगेटचे ५० नग,टिझर चे ३० एम.एल.चे ४० नग,१५ एम.एल.चे.८० नग,५४ रुपये किमतीचे कपाशीचे महिको कंपनीचे बियाणे ६० नग,१२ हजार रुपये किमतीचे कमाडो ऍग्रो स्टार कंपनीचे हँडटो ११ नग,१७ हजार रुपये किमतीचे पितळी नग २५ असा असा एकूण ०५ लाख १७ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-२७३/२०२५भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ३०५,(अ)३३४(४) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके,पो.हे.कॉ.आर.पी.पुंड आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पोलिस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.