गुन्हे विषयक
बस चालकास मारहाण,०५ जणांवर गुन्हा ! आरोपीत मनसे पदाधिकारी ?

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्य परिवहन मंडळाच्या येवला आगाराचे बस चालक कानिफनाथ मच्छिंद्र जेजुरकर (वय -४५) कोपरगाव यांनी वीणा थांबा पुणतांबा फाटा या ठिकाणी आपल्या ताब्यातील बस थांबवली नाही याचा राग मनात धरून आरोपी सतीश काकडे,बापू काकडे व अन्य तीन अनोळखी इसम यांनी आपल्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पुणतांबा फाटा या ठिकाणी आरोपींनी त्यांना अनाधिकाराने ज्या ठिकाणी बसचा थांबा नाही अशा पुणतांबा फाटा या ठिकाणी बस उभी केली नाही याचा राग आल्याने आरोपी सतीश काकडे व त्याचा भाऊ बापू काकडे यांचेसह अन्य तीन अनोळखी इसमांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी व हाताच्या चापटीने मारहाण केली आहे.आरोपी मनसेचे पदाधिकारी असल्याचे समजते.
कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांची सहनशीलता संपली की काय अशी शंका वारंवार कायदा सुव्यवस्था बाधित होत असल्याने निर्माण होत आहे.मागील हप्त्यात संगमनेर बस आगाराच्या एका वाहकास मारहाण झाल्यानंतर त्यानेही एका प्रवाशास मारहाण केल्यानंतर एका सप्ताहाच्या आत आज गुरुवार दिनांक २९ मे रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास नगर-मनमाड राज्य मार्गावर पुणतांबा फाटा या चौफुलीवर आज धक्कादायक घटना घडली आहे.

दरम्यान एका माहितीनुसार संबंधित चालकाने अन्य ठिकाणी बस उभी केली असता व आरोपींची आई गंभीर आजारी असताना सदर ठिकाणी गाडी उभी करण्याची विनंती केली असताना ती जुमानली नाही व आरोपी सतीश काकडे यांना एक आक्षेपार्ह शब्द वापरल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या शब्दामुळे संबंधित फिर्यादीस गुन्हा दाखल न करण्याचा सल्ला संबंधित चालकाच्या सहकाऱ्याने दिला असताना तो फिर्यादीने जुमानला नाही व गुन्हा दाखल केल्याची माहिती हाती आली असून काकडे यांनी फिर्यादी विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची उशिराने माहिती उपलब्ध झाली आहे.
यातील येवला बस आगाराचे चालक कानिफनाथ जेजूरकर हे आपल्या ताब्यातील बस घेऊन जात असताना आरोपींनी त्यांना अनाधिकाराने ज्या ठिकाणी बसचा थांबा नाही अशा पुणतांबा फाटा या ठिकाणी बस उभी केली नाही याचा राग आल्याने आरोपी सतीश काकडे व त्याचा भाऊ बापू काकडे यांचेसह अन्य तीन अनोळखी इसमांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी व हाताच्या चापटीने मारहाण केली व आपली अन्य नातेवाईकांना बोलावून शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला असल्याची घटना घडली आहे.त्यानंतर चालक जेजुरकर यांनी आपल्या ताब्यातील बस थेट कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आणली होती व पाच आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.सदर आरोपी हे मनसेचे पदाधिकारी असल्याची नागरिकांत मोठी चर्चा आढळून आली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-२६८/२०२५भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम १३२,१२१,(१)११८(१),११५(२),३५२,३५१,)२)१८९(१),१९०,१९१,(२) प्रमाणे पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,पो.हे.कॉ.किशोर जाधव आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.जाधव हे करीत आहेत.