जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी,१७ जणांविरुद्ध गुन्हा !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  “तुझा मुलगा बबलू केकाण याने माझ्या नातवाला कट का मारला” असा जाब साल करत अर्वाच शिवीगाळ करत आपल्याला आरोपी भागाबाई वायकर,सुभद्राबाई वायकर,धरती वायकर,संगीता वायकर,अनिल वायकर,वैभव वायकर,किरण वायकर,मुरलीधर वायकर,बाळू वायकर,अवी वायकर आदींनी आपल्याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा गुन्हा अलका मच्छिंद्र केकाण यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तर त्यांचे विरुध्द वैभव हरिभाऊ वायकर यानेही सतीश केकाण,संदेश केकाण,अलका केकाण,पूजा केकाण व अन्य २-३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे जेऊर पाटोदा आणि कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

“तुझा मुलगा बबलू केकाण याने माझा नातू यास गाडीवरून कट मारला आहे.”तू,इकडे ये”असे म्हणून…” भागाबाई वायकर हीने फिर्यादी अलका केकाण यांना पकडुन आक्षेपार्ह शब्दात शिवीगाळ करून आरोपी भागाबाई वायकर,सुभद्राबाई वायकर,धरती वायकर,संगीता वायकर आदींनी गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप अलका केकाण यांनी केला आहे.



   समाजात संयम,सहनशीलता हे गुण दुर्मिळ होत चालले असून कोपरगाव शहर आणि परिसर त्याला अपवाद नाही या परिसरातील किरकोळ कारणावरून शांतता भंग होण्याचे प्रमाण वाढले असून त्याची नुकतीच सोमवार दि.३१ मार्च २०२५ रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला अलका केकाण यांचे घरासमोर घडली आहे.(फिर्यादी महिला या कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र केकाण यांच्या धर्मपत्नी असल्याचे समजते) यातील आरोपी महिला सुभद्राबाई वायकर ही आली व तिने फिर्यादी महिला अलका केकाण यांना म्हंटले की,”तुझा मुलगा बबलू केकाण याने माझा नातू यास गाडीवरून कट मारला आहे.”तू,इकडे ये”असे म्हणून…” भागाबाई वायकर हीने फिर्यादी अलका केकाण यांना पकडुन आक्षेपार्ह शब्दात शिवीगाळ करून आरोपी भागाबाई वायकर,सुभद्राबाई वायकर,धरती वायकर,संगीता वायकर आदींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून,”तुम्ही,इथे कसे राहता ? अशी दमदाटी करून सुभद्राबाई हीने लाकडी दांडा उचलून फिर्यादीचे पाठिवर मारहाण करून त्यांना जखमी केले असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे.

  तर या घटनेची दुसरी फिर्याद पहिल्या गुन्ह्यातील आरोपींचा नातेवाईक पेंटर वैभव हरिभाऊ वायकर (वय-२६) याने दाखल केली असून त्यात त्याने म्हटले आहे की,”जेऊर पाटोदा हद्दीत दिनाक ३१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आरोपी सतीश केकाण,संदेश केकाण,अलका केकाण ,पूजा केंकाण व अन्य २ ते ३ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.दरम्यान या प्रकरणी घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, पो.हे.कॉ.आर.पी.पुंड यांनी भेट दिली आहे.

   या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र.१६८ व १६९ /२०२४भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ११८(१),१८९(२),१९०,१९१(१),(२)(३),११५(२),३५२,३५१(२) प्रमाणे दोन्ही गटातील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,पो.हे.कॉ.आर.पी.पुंड आदींनी भेट दिली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.के.ए.जाधव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close