जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

….लाखो रुपयांच्या भंगाराचा तपास लागेना,शेतकऱ्यांत संताप !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   अशोक कारखान्याचे मोठ्या प्रमाणावर भंगार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चोरी गेले परंतु त्याबाबतचा सात महिने उलटूनही तपास लागलेला नसल्याने शेतकरी संघटनेने संताप व्यक्त केला आहे.याबाबत शिष्टमंडळाने साखर आयुक्त पुणे व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना नुकतेच निवेदन देऊन तपसाला वेग देण्याची विनंतीं केली असून तपास लागला नाही तर आपण आगामी ३० एप्रिल रोजी आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे.

   

“दरम्यान सहकारातील या चुकीच्या कामकाजाबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील एकही राजकीय नेता,लोकप्रतिनिधी ‘च’ कार शब्द बोलण्यास तयार नाही.याबाबत उचित कारवाई न झाल्यास अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिनाक ३० एप्रिल रोजी पोलीस प्रशासनाच्या दालनात शेतकरी व कामगार उपोषणास बसणार आहे”- अनिल औताडे,अध्यक्ष,शेतकरी संघटना,नगर जिल्हा.

   सदर शिष्टमंडळात संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप, डॉक्टर दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, संतोष पटारे, इंद्रभान चोरमल, राजेंद्र लांडगे, कडू पवार आधी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सह्या करून शिष्टमंडळात सहभाग नोंदविला आहे.


   दरम्यान त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अशोक कारखान्याचे १५ ऑगस्ट २०२४ रोजी भंगार चोरीस गेले होते.याबाबत शेतकरी संघटनेला चाहूल लागल्याने त्यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना विचारणा केली होती.त्यांनी सदर घटनेस दूजोरा दिला होता.परंतु त्याबाबत पोलिसात तक्रार नोंदवली गेली नव्हती.सदर बाब चुकीची असून कारखान्याचे स्टोअर ऑडिट झाल्यास कार्यकारी संचालक दोषी आढळून येतील त्यामुळे आपण फिर्याद नोंदवावी असे कार्यकारी संचालकांकडे संघटनेने मागणी केली होती.अखेर ९ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध सुरक्षा अधिकारी बाळासाहेब राऊत यांनी नोंदविला होता.सदर तक्रारीस चोवीस दिवसाचा विलंब होऊनही फिर्यादीने विलंबाची कारणे दिली नव्हती हे विशेष ! दिलेल्या

  त्यांनी सदर फिर्यादीत एक लाख रुपये किमतीचा फॉस्फरस,ब्रांच बेरिंग दोन नग असा ऐवज गेला असल्याचा उल्लेख केला होता.या प्रकरणी साखर आयुक्त यांना सदर कारखान्याच्या स्टोअरचे व कारखान्याच्या अकाउंट विभागाचे सहकार अधिनियम कलम ८९ अन्वये तात्काळ चौकशी करणे आवश्यक आहे.अशोकच्या सभासदांनी गेल्या चाळीस वर्षापासून सदर संस्था मोठ्या विश्वासाने एक हाती ठेवली आहे.तीन महिने उलटूनही ऊस उत्पादकांचे चुकारे व्यवस्थापन समितीने अद्याप दिले नाही.शेतकरी आर्थिक अडचणीत असताना व आत्महत्याच्या उंबरठ्यावर असताना अशोक कारखान्यातून आर्थिक अपहरण बरोबरच अशाप्रकारे भंगार चोरी जाणे ही खेदजनक बाब आहे.कारखान्याच्या इतिहासात कधीही ई टेंडर पद्धतीने अथवा जाहीर टेंडर नोटीस काढून भंगार मालाचे लिलाव झाले नाही.कारखान्याने सातत्याने अशाच प्रकारे कोट्यावधी रुपये किमतीच्या भंगारची विल्हेवाट लावली आहे.सदर संस्था पुढच्या पिढी करता जतन ठेवणे हे तालुक्यातील जनतेचे काम आहे.अशोक कारखान्याच्या माध्यमातून काही लोकांनी आपली घरे भरण्याचे काम केले मात्र आगामी काळात ते होऊ देणार नाही.सदर चोरी प्रकरण संशयास्पद असल्याने त्याची चौकशी होणे गरजेचे बनले असल्याचे शेवटी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल औताडे यांनी म्हटले आहे.

     दरम्यान सहकारातील या चुकीच्या कामकाजाबद्दल एकही राजकीय नेता,लोकप्रतिनिधी ‘च’ कार शब्द बोलण्यास तयार नाही हे लोकशाहीचे दुर्दैव आहे.याबाबत उचित कारवाई न झाल्यास अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिनाक ३० एप्रिल रोजी पोलीस प्रशासनाच्या दालनात शेतकरी व कामगार उपोषणास बसणार आहे असा इशाराही निवेदनात देऊन सदरची जबाबदारी श्रीरामपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार व प्रशासनावर राहील असे शेवटी अनिल औताडे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close