गुन्हे विषयक
शहरात पुन्हा एकदा दोन गटात राडा,टोळीयुद्ध सदृश स्थिती ?

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरात काल रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटात तलवार,चाकू,लाकडी दांडे अन्य गंभीर हत्यारांचा राजरोस वापर होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन त्यात दोन गटातील अतुल देविदास आव्हाड त्याचा साक्षीदार,सुरेश पंडोरे आदी तीन जाणं गंभीर जखमी झाले असल्याचे उघड झाले असल्याने कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.यातील आरोपी हे अवैध व्यवसायातील मातब्बर मानले जात असल्याने त्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना नाक खाजवून दाखवून आव्हान निर्माण केले असल्याचे मानले जात आहे.यात अनिल आव्हाड हा कोपरगाव नगरपरिषदेचा माजी सभापती असल्याचे माहिती आहे.

दरम्यान यातील एक वाळूचोरीत मातब्बर असलेल्या एका प्रमुख आरोपीचे अनेक धंदे असून त्यात मटका,गुटखा यासह अनेक धंद्यात नाव पुढे येत असून पोलिस अधिकाऱ्यांत त्याची उठबस असून याच्या या संबंधाचा फायदा घेत त्याने आपले शहरात मोठे बंस्तान बसवले आहे.यातील एका बदलून गेलेल्या अधिकारी तर चक्क मटण पार्टी झोडण्यास जात असल्याची माहिती आहे.
कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्था तोळा मासा शिल्लक राहिली असल्याचे दिसत असून एखाद्या दिवशी याची मोठी किमंत शहरास चुकवावी लागणार असे दिसू लागले असल्याचे म्हटले होते त्यात दिवसेंदिवस परिस्थिती ढासळत चालली असल्याचे दिसून येत आहे.त्यातून कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण अडीच कि.मी.असलेल्या नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीजवळ दि.२४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती.त्यातील केवळ दोन आरोपींना कोपरगाव शहर पोलिस पकडू शकले आहे.त्यातील दोघांना दोन दिवसांची कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी पोलिस कोठडी सुनावली असताना व अन्य आरोपी अद्याप अद्याप मोकाट असताना वाळू,अवैध दारू,मटका,यातील आरोपींनी पुन्हा एकदा कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवले असल्याचे काल दि.२७ मार्च रोजी रात्री ११ वाजता दिसून आले आहे. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असेल तरी त्यात नेमके कारण नमूद केले नाही.केवळ मागील भांडणाचे कारण दर्शवले आहे.मात्र यातील आरोपींचे नावे लक्षात घेता ती सर्व अवैध वाळू,मटका,दारू यातील असल्याचे निष्पन्न होत असल्याने पोलिसांना त्यांनी पुन्हा एका दणका दिला आहे.त्यानी या हाणामारीत थेट चित्रपटात शोभतील अशी हत्यारे वापरली असून त्यात तलवारी,गज,लाकडी दांडे,दगड आदींच्या सहाय्याने शिवीगाळ करत जोरदार हल्ला चढवला होता.

दरम्यान मागील गुन्ह्याची गंभीर दखल नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घेतली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून त्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या जबाबदार अधिकाऱ्याची चांगलीच झाडा झडती घेतली असल्याची माहिती असून फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याचे फर्मान सोडले आहे.
यातील पहिल्या फिर्यादीत कोर्ट रोड येथील फिर्यादी व कोपरगाव नगरपरिषदेचा माजी सभापती अनिल विनायक आव्हाड याने म्हटले आहे की,”यातील आरोपी अतुल आव्हाड व त्याचे अन्य दोन साथीदार (नावे माहिती नाही) यांनी काल दिनाक २७ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजता आपल्या घरासमोर शिवीगाळ,आरडा-ओरडा करत येऊन मागील भांडणाचे कारणावरून आपल्याला व आपल्या साथीदार सुरेश पंडोरे याचे डोक्यात दांडक्याने मारून ढकलून देऊन खाली पाडून गंभीर दुखापत केली आहे.दरम्यान यातील अनिल आव्हाड यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी मध्ये आली असता तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करून अनिल आव्हाड यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
या प्रकरणी शहर पोलिंसात गुन्हा क्रं.-क्रमांक-१६६/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ११८(१),११५(२),३५२,३५१(२) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार,भूषण हांडोरे यांनी भेट दिली आहे.

तर दुसऱ्या गुन्ह्यात गजानननगर येथील अतुल देविदास आव्हाड (वय-१९) हा फिर्यादी असून त्याने आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,”आपण आरोपी अनिल आव्हाड आणि त्याचे सहकारी यांना म्हणालो की,’ माझ्या ओळखीच्या मुलास मारू नका असे म्हणाल्याचा राग येऊन अतुल आव्हाड त्याचा सहकारी आदींना संगमंमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून तलवार,बेस बॉल आदींच्या सहाय्याने आपल्या कपाळावर,हातावर पायावर,मारून गंभीर जखमी केले आहे.त्यात त्याने आरोपी म्हणून कालू अप्पा आव्हाड,सोन्या आव्हाड,सागर पंडोरे,शुभम आढाव,नितीन हमरे,अविनाश गीते,अंकुश (पूर्ण नाव नाही),सोनू बोडखे व इतर ३-४ जण (नावे माहिती नाही)आदी दहा ते अकरा जणांचा आरोपात समावेश केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिंसात गुन्हा क्रं.-क्रमांक-१६५/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ११८(१),११८(२),११५(२),३५२,३५१(२),१८९(२),१९१(२),१९१(३),१९०,१९१(१),व अर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यातील किती आरोपींना अद्याप कोणालाहीअटक केली नाही.अद्याप गुन्हे दखल करून पंचनामे सुरु असल्याची माहिती चौकशी अधिकारी भूषण हांडोरे यांनी दिली आहे.
दरम्यान यातील एक वाळूचोरीत मातब्बर असलेल्या एका प्रमुख आरोपीचे अनेक धंदे असून त्यात मटका,गुटखा यासह अनेक धंद्यात नाव पुढे येत असून पोलिस अधिकाऱ्यांत त्याची उठबस असून याच्या या संबंधाचा फायदा घेत त्याने आपले शहरात मोठे बंस्तान बसवले आहे.यातील एका बदलून गेलेल्या अधिकारी तर चक्क मटण पार्टी झोडण्यास या महाशयांच्या घरी जात असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीच्या हाती आली आहे.अशा स्थितीत गुन्हेगार पोलिस अधिकाऱ्यांना कसे जुमाननार असा सवाल निर्माण होत आहे.
दरम्यान मागील गुन्ह्याची गंभीर दखल नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घेतली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून त्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या जबाबदार अधिकाऱ्याची चांगलीच झाडा झडती घेतली असल्याची माहिती असून फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याचे फर्मान सोडले असल्याची माहिती हाती आली आहे.