गुन्हे विषयक
विद्यार्थ्यांवर चॉपरने हल्ला,एक जखमी,गुन्हा दाखल

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरानजिक गोदावरी काठी असलेल्या के.जे.सोमय्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला जेऊर कुंभारी येथील रहिवासी असलेला विद्यार्थी ओंकार संतोष अहिरे (वय-१७) असलेल्या विद्यार्थ्याने महाविद्यालयीन आवारात आपला खिसा फाडला याची तक्रार महाविद्यालयातील प्राध्यापक यांचेकडे केली याचा राग येऊन दुसरा पुणतांबा येथील आरोपी विद्यार्थी ओम धट व गांधीनगर येथील दुसरा विद्यार्थी प्रतीक वाघ आदींनी त्यास याने शिवीगाळ करून चोपर व हातातील कडे आदींच्या सहाय्याने मारहाण केल्याने त्यात ओंकार अहिरे हा गंभीर जखमी झाला आहे.त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांत खळबळ उडाली आहे.

के.जे.सोमय्या महाविद्यालयात वर्तमानात प्रभारी राज आहे.त्यामुळे या महाविद्यालयावर असलेली पकड ढीली झाली की काय अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.कारण आज सकाळी ११ वाजेंच्या सुमारास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली असून तीही प्रशासनाचे नाकाखाली म्हणजेच महाविद्यालयीन आवारात हे विशेष !
कोपरगाव तालुक्यात माध्यमिक व महाविद्यालयांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.त्यासाठी देशभरातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतानाच अलीकडील काळात महाविद्यालयीन गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे.यावर महाविद्यालयाच्या प्रशासनाचे नियंत्रण असणे गरजेचे असताना मात्र ते दिसत नाही.अनेक महाविद्यालये तर गुन्हे दडपून नेण्याकडे त्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या गुन्ह्यात अलीकडील काळात मोठी वाढ होताना दिसत आहे.त्यात आज सकाळी ११ वाजता आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.
कोपरगाव शहराच्या दक्षिणेस गोदावरी नदीतीरी असलेल्या के.जे.सोमय्या महाविद्यालय अलीकडील काळात चांगले नावारूपास आले आहे.विद्यापीठाने त्यांना काही वर्षांपूर्वी ‘ए’ मानांकन दिलेले आहे.मात्र मध्ये वरिष्ठ पदाधिकारी असलेले प्राचार्य सेवानिवृत्त झालेले आहे.वर्तमानात प्रभारी राज आहे.त्यामुळे या महाविद्यालयावर असलेली पकड ढीली झाली की काय अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.कारण आज सकाळी ११ वाजेंच्या सुमारास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली असून तीही प्रशासनाचे नाकाखाली म्हणजेच महाविद्यालयीन आवारात झाली आहे हे विशेष !
याबाबत फिर्यादी विद्यार्थी ओंकार अहिरे याने आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,’आपण जेऊर कुंभारी येथील रहिवासी असून त्या ठिकाणाहून जाऊन येऊन करत असून ११ वी विज्ञान या शाखेत महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.माझ्या ओळखीचे असलेले विद्यार्थी ओम धट आणि प्रतीक वाघ हे आहेत.त्यांनी महाविद्यालयीन आवारात आपला खिसा फाडला होता.याची तक्रार आपण महाविद्यालयातील प्राध्यापक श्री जपे यांचेकडे केली होती.याचा राग येऊन दुसरा पुणतांबा येथील आरोपी विद्यार्थी ओम धट व गांधीनगर येथील दुसरा विद्यार्थी प्रतीक वाघ आदींनी आपणास वाईटसाईट शिवीगाळ करून चॉपर व हातातील कडे आदींच्या सहाय्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यात आपण गंभीर जखमी झालो आहे.या प्रकरणी आपले दुसरे मित्र आदित्य पाठक,सार्थक जाधव आणि ओम जावळे आदींनी आपली सोडवणूक केली आहे.आपण कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांत खळबळ उडाली आहे.या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-१२३/२०२५भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ११८(१),११५(२),३५२,३५१(२) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी हे करीत आहेत.