जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शहरात १.१५ लाखांची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील श्रद्धानगरी येथील रहिवासी असलेले फिर्यादी यांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून आतील कपाटातील ०१ लाख १५ हजारांचे सोन्याचे विविध दागिने
अज्ञात चोरट्याने लंपास केले असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात सेवानिवृत्त कर्मचारी शरद माधवराव कांबळे (वय-७०) रा.शिषम निवास,प्लॉट क्रं.१७/१ यांनी दाखल केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

   

फिर्यादीच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने त्यांच्या लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने त्यात ३० हजार रुपयांच्या लहान मुलांच्या १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या,०५ हजार रुपये किमतीचे ६० ग्रॅम वजनाचे चांदीचे शिक्के,वाटी,लहान मुलाचे पैंजण,८० हजार रूपयांची रोकड,त्यात ५००,२०० रुपये दराच्या नोटा आदी मिळून ०१ लाख १५ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.

   राज्यात पुन्हा एकदा थंडी जाणवू लागली आहे,गेल्या आठवडाभरात राज्यातील अनेक शहरांमध्ये उष्णता,अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण असं संमिश्र वातावरण दिसून आलं.मात्र,आता कोपरगावसह पुन्हा राज्यात गारठा वाढू लागला आहे.उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कमाल आणि किमान तापमानात पुन्हा घट होताना दिसत आहे.  उत्तर महाराष्ट्रात देखील गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.गारठा वाढल्यामुळे नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत,तर पुढील दहा दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात गारठा आणखी वाढू शकतो.परिणामी घराच्या बाहेर थंडीचा कहर असल्याने बाहेर कोणी झोपत नाही.परिणामी चोरट्यांनी चांदी होत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरात असलेल्या श्रद्धानगरी येथे उघड झाली आहे.यातील फिर्यादी हे सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांनी आपल्या आयुष्याची पूंजी सोन्या नाण्यात गुंतवली होती.ते दिनांक ११ डिसेंबरच्या रात्री झोपी गेले असता त्यांच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून त्यात घरात सर्व झोपेलेले आहेत याची खात्री करून अज्ञात चोरट्याने त्यांच्या लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने त्यात ३० हजार रुपयांच्या लहान मुलांच्या १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या  बाळ्या,०५ हजार रुपये किमतीचे ६० ग्रॅम वजनाचे चांदीचे शिक्के,वाटी,लहान मुलाचे पैंजण,८० हजार रूपयांची रोकड,त्यात ५००,२०० रुपये दराच्या नोटा आदी मिळून ०१ लाख १५ हजार रुपयांच्या ऐवजावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला आहे.ही बाब त्यांच्या सकाळी उठल्यावर लक्षात आली आहे.त्यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-५५५/२०२४भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ३३१,(४)३०५(अ) प्रमाणे पाचही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने,सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके,पोलिस उपनिरीक्षक हांडोरे,हे.कॉ.डी.आर.तिकोने आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.आर.पी.पुंड आहे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close