गुन्हे विषयक
चोरीतील आरोपी फरार,शिर्डीत गुन्हा दाखल
न्यूजसेवा
शिर्डी (प्रतिनिधी)
मध्यप्रदेश येथील सोयाबीन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपीसह शिर्डीत आलेल्या पोलीस पथकाला रात्री एका हॉटेलमध्ये नजर चुकवून सोयाबीन चोरीतील आरोपी फरियाद उर्फ मंजुर खाँन रा.बालगाव ठाणा बलकवाडा जि.खरगौन हा पहाटे खिडकीतून पळून गेला आहे.त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”लिमाचौहान जिल्हा राजगढ राज्य मध्यप्रदेश येथील पोलिस उपनिरीक्षक अनिल राहोरीया यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की,आपण वरील ठिकाणी एक वर्षापासुन नेमणुकीस असुन एस.एच.ओ.चे कामकाज पाहतो.थाना पचोर जि. राजगढ मध्यप्रदेश अपराध क्रं.४०६\२०२४ धारा ३०३(२) बी.एन. एस.या गुन्हयाचा सोयबिन चोरीचा तपास चालु असुन त्या तपासा साठी आपल्या सोबत उपनिरीक्षक राहुल रघुवंशी,अजय यादव,खेमेन्द्रे खीची,रवेन्द्र जाट,रवि जाट असे आलो असता सदर गुन्हयातील आरोपी मोहसिन खान उर्फ फिका खान रा.बालसमद थाना कसरवाडा,आरिफ उर्फ रहीम खान रा.बालसमद थाना कसरवाडा,सोनु उर्फ नवाब खान रा. बलगांव थाना बलकवाडा,सिंकदर उर्फ छोटा खान रा.बलगांव थाना बलकवाडा,फरियाद उर्फ मंजुर खॉ रा यांच्यासह सह दि.१७ नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेश येथुन काल दि.२४ नोव्हेंबर रोजी दुपारी ०४ वा सुमारास शिर्डी येथे आलो व शिर्डी मध्ये इकबालभाई शेख रा.शिर्डी ता.राहाता जि.आहिल्यानगर यांच्याकडे सोयाबिन चोरीची विचारपुस करून रात्री उशीर झाल्याने हॉटेल ड्रीम पॅलेस शिर्डी ता.राहाता जि.आहिल्यानगर येथे थांबलो असता दि.२४ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ०५ वा.सुमारास आम्ही शिर्डी येथील हॉटेल ड्रीम पॅलेस शिर्डी ता.राहाता जि.आहिल्यानगर येथे रुम नंबर २०३ मध्ये उपनिरीक्षक अनिल राहोरिया,राहुल रघुवंशी,अजय यादव असे होते.
दरम्यान २०६ मध्ये खेमेन्द्रे खीची,रवेन्द्र जाट टारवि जाट व त्याच्या सोबत आरोपी मोहसिन खान उर्फ फिका खान रा.बालसमद थाना कसरवाडा,आरिफ उर्फ रहीम खान रा.बालसमद थाना कसरवाडा,सोनु उर्फ नवाब खान रा.बलगांव थाना बलकवाडा,सिंकदर उर्फ छोटा खान रा.बलगांव थाना बलकवाडा,फरियाद उर्फ मंजुर खाँ रा.बालगाव ठाणा बलकवाडा जि.खरगौन असे आरामासाठी थांबले असता त्यांच्या रुममध्ये सोबत असलेला आरोपी फरियाद उर्फ मंजुर खाँन रा.बालगाव ठाणा बलकवाडा जि. खरगौन हा रुम नं.२०६ मध्ये आमच्या अंमलदार यांची नजर चकवुन पहाटे ४.३० ते ०५ वा सुमारास खिडकीतून पळून गेला आहे.
आम्ही सदर पळून गेलेल्या आरोपीचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला पंरतु तो मिळून आला नाही म्हणून माझी आरोपी नामे फरियाद उर्फ मंजुर खॉन रा.बालगाव ठाणा बलकवाडा जि.खरगौन यांच्याविरुध्द भारतीय न्यांय संहीता २०२३ चे कलम २६२ प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.अशा आशयाच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन नं.६४२/२०२४ भा.द.वि.कलम २६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकारी या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.