गुन्हे विषयक
रब्बी हंगामात चोरट्यांचा उपद्रव सुरू !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या महावितरण कंपनीच्या ३६ हजार ६०० रोहीत्रातील ऑईल आणि तांब्याची तारेची चोरी झाली असल्याची फिर्याद महावितरण कंपनीच्या चांदेकासारे येथील कनिष्ठ अभियंता हर्षा अशोक मोजाडे (वय-२३) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
वर्तमानात रब्बी पिकांचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देण्याची नितांत गरज आहे.अशा वेळी चोरट्यांनी आपला हात उचलून घेतला असल्याचे दिसून आले असून त्यांनी विद्युत पंप आणि विद्युत रोहित्रांच्या साहित्याची चोरी ही सामान्य बाब ठरली असून शेतकऱ्यांना त्यामुळे मोठी किंमत चुकवावी लागत आहे.अशीच घटना नुकतीच सोनवाडी हद्दीत गट क्रमांक २५७ मध्ये काल रात्री बाराच्या सुमारास घडली आहे. त्यातील ०३ हजार रुपये किमतीचे ऑईल आणि ३३ हजार ६०० रुपये किमतीची तांब्याची तार असा ३६ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी कोणाचे लक्ष नाही ही संधी साधून चोरून नेली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-379/2024 भारतीय विद्युत अधिनियम सुधारणा कायदा 2003 चे कलम २३६ सह भारतीय न्याय संहिता सन-2023 चे कलम 324,(3)प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी, पो.उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कूसारे हे करीत आहेत.
दरम्यान धोंडेवाडी हद्दीत कृषी विभागाची अनुदानाची आणखी एक विद्युत मोटारीची चोरी झाली असून त्या प्रकरणी त्यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात चंद्रकांत नामदेव थोरात यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.