धार्मिक
शिर्डीत भक्ताकडून साईबाबास सोन्याचा मुकुट

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आंध्रप्रदेश राज्यातील बापटला येथील दानशुर साईभक्त अन्नम सतिष प्रभाकर यांनी ७७० ग्रॅम वजनाचा ३६ लाख ९८ हजार ३१० रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट व ६२० ग्रॅम वजनाचे ३३ हजार ४८० रुपये किंमतीचे चांदीचे ताट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले आहे.
शिर्डीतील साई बाबांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यांना अनुभूती येत असून त्याची भक्ती दिवसेंदिवस वाढत आहे.असाच अनुभव साईभक्त अण्णां प्रभाकर यांना आला आहे.त्यांनी सदरची देणगी स्विकारताना संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत आदी मान्यवर उपस्थित होते.