जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पैशासाठी महिलेचा छळ,पाच जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

गुंडेवाडी जालना येथील सासर असलेल्या व संजीवनी गेट कोपरगाव येथील माहेर असलेल्या महिलेने आपल्या माहेराहून पैसे आणावे यासाठी तिचा नवरा जितेंद्र एकनाथ पटेकर,सासू कमाल एकनाथ पटेकर,व नणंद सरिता वाल्मीक सरोदे,ज्योती संदीप घाटेशाही,आम्रपाली कांतीलाल मोकळे आदींनी आपला शारिरीक व मानसिक छळ केला असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केल्याने राहाता,कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.संजीवनी गेट येथील रहिवासी फिर्यादी महिलेचे नाव पूजा जितेन्द्र पटेकर (वय -26)असे आहे.

  

“आपल्या नवऱ्यासह अन्य नातेवाईकांनी आपल्या माहेराहून पैसे आणावे यासाठी दि.14 फेब्रुवारी 2021 पासून लग्न झाले नंतर सहा महिन्यांनी वारंवार आपला शारिरीक व मानसिक छळ केला आहे.पैसे आणले नाही तर नांदवणार नाही अशी धमकी देऊन मारहाण करत शिवीगाळ केली आहे”- फिर्यादी महिला.

  सन-1986 मध्ये हुंड्यापासून संरक्षण देण्यासाठी कलम 498-अ या कलमाची तरतूद करण्यात आली.हुंड्याच्या मागणीसाठी शारिरीक अथवा मानसिक अशा कोणत्याही पद्धतीने महिलेचा छळ केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.पत्नीला सासरी झालेल्या त्रासाबद्दल पती हा प्राथमिक स्वरुपात जबाबदार असतो.अशा प्रकरणात हा त्रास नातेवाईकांकडून जरी झालेला असला तरी पतीचीही त्यामध्ये जबाबदारी असते असं न्यायालयाने वेळोवेळी म्हटलं असताना या गुन्ह्यात काही कमी येताना दिसत नाही.अशीच घटना नुकतीच जालना जिल्ह्यातील गुंडेवाडी येथे घडली आहे.

  यात फिर्यादी महिलेने म्हटले आहे की,”आपण सासरी नांदत असताना आपल्या लग्नानंतर नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर आपले खरे रूप दाखविण्यास सुरुवात केली होती.पतीची आपल्याला सांभाळण्याची जबाबदारी असताना देखील काही दिवसानंतर त्यांनी आपल्या माहेराहून पैसे आणावे यासाठी दि.14 फेब्रुवारी 2021 पासून लग्न झाले नंतर सहा महिन्यांनी वारंवार आपला शारिरीक व मानसिक छळ केला आहे.पैसे आणले नाही तर नांदवणार नाही अशी धमकी देऊन मारहाण करत शिवीगाळ केली आहे.असा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

या प्रकरणी आरोपी नवरा जितेंद्र एकनाथ पटेकर,सासू कमाल एकनाथ पटेकर,व नणंद सरिता वाल्मीक सरोदे,ज्योती संदीप घाटेशाही,आम्रपाली कांतीलाल मोकळे आदींविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केल्याने जालना जिल्ह्यासह,कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-402/2024 भारतीय न्याय संहिता सन-2023 चे कलम 85,115(2),352,351,(2)(3) प्रमाणे पाचही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,[ओ.हे.को अर्जुन दारकुंडे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close