गुन्हे विषयक
चोरट्यांचा पुन्हा दोन लाखांवर डल्ला,सोने,गुन्हा दाखल
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाजार समितीनजिक असलेल्या सुभद्रानगर येथील चोरीची शाई वाळते न वाळते तोच तालुका हद्दीत ब्राह्मणगाव शिवारात किरण अशोक कुऱ्हाडे (वय -41)यांची सोन्याच्या दागिन्यांसह 60 हजार रुपये रोख अशी सुमारे दोन लाख रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाल्याने ब्राम्हणगाव सह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वर्तमानात पावसाने जोर पकडला असला तरी अद्याप विहिरींची भूजल पाणी पातळी वाढलेली नाही परिणामी चोऱ्यांचे प्रमाण तालुक्यात वाढले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.यातच चोरट्यांनी आपला हात उचलून घेतला असल्याचे ब्राम्हणगाव येथील या घटनेवरून उघड झाले आहे.कोपरगाव तालुक्यात याचा दाहक अनुभव येथील ग्रामस्थांना आला आहे.
या घटनेतील फिर्यादी इसम किरण कुऱ्हाडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,”दि.06 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजेनंतर आपले नैमित्तिक कामे उरकून आपण आपल्या कुटुंबासह झोपी गेलो असता रात्री कधीतरी अज्ञात चोरट्यांनी आपल्या घरावर पाळत ठेवून घरात चोरट्या मार्गाने प्रवेश करून घरातील 01 लाख 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने त्यात सोन्याच्या पळ्या,सोन्याची पोत,सोन्याचे कानातील वेल,सोन्याचे लहान मोठे मनी,असे एकूण 4.5 तोळे वजनाचे दागिने लंपास केले आहे.या शिवाय चोरट्यांनी आपल्या घरातील रोख रक्कम 60 हजार रुपये त्यात 500,100 रुपयांच्या नोटा असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे.त्यांच्या सकाळी हि बाब लक्षात आली असता तो पर्यंत उशीर झाला होता.त्यांनी य प्रकरणी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.309/2024 भारतीय दंड संहिता सन- 2023 चे कलम 305(अ),331(4) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस हे.को.निजाम शेख यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कूसारे हे करीत आहेत.