जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…या तालुक्यात पुन्हा एकदा ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा ?

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)


    कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या गणेश कोळपे याने सामाजिक संकेतस्थळावर काळाराम मंदिराच्या चित्रफितीवर जातीवाचक व अनावश्यक प्रतिक्रिया नोंदवल्याचा अनिष्ट परिणाम समोर आला असून या अदखलपात्र तरुणांच्या आततायीपणामुळे दोन समाज धक्कादायकरित्या एकमेका समोर उभे ठाकले असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी गणेश संजय कोळपे याचे विरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल केला आहे.या उद्योगात तालुका पोलिसांची मोठी दमछाक झाली असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान यातील आरोपी तरुणावर व त्याच्या भावावर या पूर्वी वाळूचे अनेक गुन्हे दाखल आहेत.या शिवाय अनेक पोलिस अधिकारी आणि महसूल अधिकारी यांना लाचलुचपत विभागास पकडुन दिलेले आहे.दोन्ही भाऊ संघटित गुन्हेगारीत अडकेले असल्याने त्यांना हद्दपार केलेले आहे.तर फिर्यादी तरुण फार दखलपात्र असल्याचे कोणी म्हणणार नाही त्यामुळे पोलिसांनी दोन्ही समाजाला एकत्र आणून यात समझोता करणे गरजेचे बनले आहे.

  अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ (कायद्याचे योग्य नाव) हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार आणि द्वेषपूर्ण गुन्हे रोखण्यासाठी लागू केलेला भारतीय संसदेचा एक कायदा आहे.हा कायदा एस.सी,एसटी कायदा,पी.ओए,अत्याचार प्रतिबंधक कायदा किंवा फक्त अॅट्रॉसिटी कायदा म्हणून देखील ओळखला जातो.२० मार्च २०१८ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नमूद केल्यानुसार या कायद्याच्या गैरवापराची अनेक प्रकरणे देशाच्या विविध भागांतून नोंदवली गेली आहेत.या निकालात,भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अपमान किंवा दुखापत केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या तात्काळ अटकेवर बंदी घातली आहे.यातच सर्व काही आले आहे.मात्र अजूनही या प्रकरणात काही कमी आल्याची उदाहरणे नाही.म्हणून सर्व प्रकरणात खोटे गुन्हे दाखल होतात असेही नाही.मात्र यात काही समाजातील अदखलपात्र असामाजिक तत्व यात सहभागी होऊन त्याचा नाहक त्रास दोन्ही समाजाला होत असेल तर ही बाब चिंताजनक मानली पाहिजे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यात सूरेगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली असून यात निमित झाले आहे येथील अनेक गुन्हे दाखल असलेला तरुण गणेश कोळपे याने सामाजिक संकेतस्थळावर एक वादग्रस्त प्रतिक्रिया नोंदवली त्यामुळे रान पेटले आहे.वाद दोन उडाणटप्पुंचा व्यक्तींचा असताना त्यात समाजाला वेठीस धरण्याचे काम दोन्ही गटाकडून सुरू असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.
   यातील आरोपी हा या पूर्वी अनेक गुन्हे दाखल झालेला आहे.तर संघटित गुन्हेगारी प्रकरणांत त्यास हद्दपार केलेले आहे.तर फिर्यादी हा काही उपयुक्त असल्याचे उदाहरण नाही.तरीही त्यांचे एवढे गांभीर्याने घेण्याची गरज नव्हती मात्र सदर व्यक्ती आपल्या समाजाची आहे.हा एक दृष्टिकोन संपूर्ण समाजाला वेठीस धरत असेल तर जातीयवाद किती टोकदार बनला आहे.याचे हे प्रातिनिधिक उदाहरण ठरावे असे म्हणण्यास जागा आहे.वास्तविक या सूरेगावात धनगर आणि इतर मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणावर आहे.यात बहुधा या दोन्ही समाजात जास्तकरून वाद होताना दिसत नाही.मात्र मराठा विरुद्ध ही सर्व मंडळी एकत्र आल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे.मात्र यावेळी झाले उलटे.जो समाज गुण्यागोविंदाने राहत आहे.त्यांच्यात वाह्यात दोन वाह्यात तरुणांनी हा वाद पेटवला असल्याचे दिसून येत आहे.वास्तविक दोन्ही गटांनी यात एकत्र येऊन समन्वय काढला असता तर प्रकरण एवढं हातघाईवर आले नसते.मात्र या प्रकरणात घाई झालेली दिसत आहे.

   यात फिर्यादी रोशन सुदाम निकम (वय-27 वर्षे) याने आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,”विशिष्ठ जातीला लक्ष करत त्यांना टीका टिपणी केली होती.त्यावरून त्यास जाब विचारण्यास फिर्यादीचे मित्र निलेश माधव मेहेरखांब,ऋतीक राजेंद्र मेहेरखांब दोन्ही रा.सुरेगाव हे शनिचौक सुरेगाव ता कोपरगाव येथे उभे असतांना तेथे गणेश संजय कोळपे हा आला त्यास रोशन याने सदर कमेंटच्या अनुषंगाने विचारना केली असता आरोपीने “अरे….(जातीचा उल्लेख करून) तुम्ही माजले तुमच्या गळ्यात मडके होते व पाठीला झाडु होता तेच बरे होते आता तुम्ही खुप माजले” तुम्हाला सवलती मिळायला लागल्या तुमच्याकडे पैसे आले “असे वैगरे वैगरे… भूतकाळातील वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यास फिर्यादी म्हणाला की,” तु जातीवर बोलु नको,निट बोल” असे म्हणताच तो दमदाटी करुन तेथुन निघुन गेला,असुन त्याने आमचे समाजाचे लौकीकास बाधा आणली असल्याचा गुन्हा फिर्यादी रोशन निकम याने मंगळवार दि.03 सप्टेंबर 2024 रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

    या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-305-2024 अनुसूचित जाती व जमाती का.कलम 3 (1)(आर) (एस.)भारतीय न्याय संहिता सन-2023 चे कलम 351(2) (3) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने,पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस उपनिरीक्षक श्री.पगार आदींनी भेट दिली आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सुरेगाव येथे चोख पोलिस  बंदोबस्त ठेवला आहे.

   दरम्यान यातील आरोपी तरुणावर व त्याच्या भावावर या पूर्वी वाळूचे अनेक गुन्हे दाखल आहेत.या शिवाय त्यांनी अनेक पोलिस अधिकारी आणि महसूल अधिकारी यांना लाचलुचपत विभागास पकडुन दिलेले आहे.तर यातील दोन्ही भाऊ संघटित गुन्हेगारीत अडकेले असल्याने त्यांना हद्दपार केलेले आहे.यातील काही आरोपींकडे गावठी कट्टे असल्याची विश्वसनीय माहिती आहे.महुसल आणि पोलिसांनी वाळूचोरांना डोक्यावर बसविल्याचे हे दुष्परिणाम असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.तर फिर्यादी तरुण फार दखलपात्र असल्याचे कोणी म्हणणार नाही त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही समाजाचा संबंध नसल्याने दोन्ही समाजाला एकत्र आणून यात समझोता करणे गरजेचे बनले असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close