गुन्हे विषयक
दिवसा चोरी,शहर पोलिसांत गुन्हा !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाजार समिती नजिक असलेल्या सुभद्रानगर येथील ‘साई व्यंकटेश टॉवर’ येथे रहिवासी असलेले फिर्यादी इसम सतीश सुरेश भालारे (वय -43) यांच्या बंद घराचे कुलूप काल दुपारी 4.24 वाजता तोडून अज्ञात चोरट्याने घरातील अडीच तोळे सोन्याचे दागिने,एक मोटारोला कंपनीचा मोबाईल व पाच हजार रुपये असा सुमारे 72 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याने निवारा आणि सुभद्रानगर परिसरात खळबळ उडाली आहे.

बाजार समितीच्या पश्चिमेस असलेल्या,’साई व्यंकटेश टॉवर’ येथे फिर्यादी इसम सतीश भालारे हे आपल्या कुटुंबासोबत राहत असून ते काल दिनांक 01 सप्टेंबर रोजी काही कामानिमित्त घरास कुलूप लावून बाहेरगावी गेले होते.ते सायंकाळी घरी आले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडलेल्या स्थितीत आढळून आले आहे.
वर्तमानात पावसाने जोर पकडला आहे.त्यामुळे घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.यातच चोरट्यांनी आपला हात उचलून घेतला असल्याचे एका घटनेवरून उघड झाले आहे.कोपरगावात याचा दाहक अनुभव येथील नागरिकांना आला आहे.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पश्चिमेस असलेल्या,’साई व्यंकटेश टॉवर’ येथे फिर्यादी इसम सतीश भालारे हे आपल्या कुटुंबासोबत राहत असून ते काल दिनांक 01 सप्टेंबर रोजी काही कामानिमित्त घरास कुलूप लावून बाहेरगावी गेले होते.ते सायंकाळी घरी आले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडलेल्या स्थितीत आढळून आले असून त्यांनी याबाबत घरात जावून आपल्या चीजवस्तूची पाहणी केली असता त्यांना आपल्या घरातील अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र व दोन सोन्याच्या अंगठ्या,सोन्याचे वेल असा किमती ऐवज चोरून नेला असून त्या सोबत त्यांनी एक 07 हजार रुपये किमतीचा मोटारोला कंपनीचा वापरता मोबाईल,05 हजार रुपये रोख त्यात 200,100,20,10 रुपयांचा नोटा असा सुमारे 72 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.त्यामुळे ही बाबत त्यांच्या लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.374/2024 भारतीय दंड संहिता सन- 2023 चे कलम 305(अ),331(3) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.आर.पी.पुंड हे करीत आहेत.