जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

बांधून ठेवून मारहाण,खोटा फोन,पोलिसांचा गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

आपल्याला रवंदे येथील पंधरा ते वीस लोकांनी आपला मोबाईल फोन हिसकावून घेऊन व चाकूचा धाक दाखवून आपल्याला मारहाण करीत असल्याचा शासकीय तक्रार सुविधा फोनवर 112 वर खोटा दूरध्वनी करून कोपरगाव तालुका पोलिसांची फसवणूक केल्या प्रकरणी चाळीसगाव येथील आरोपी शशिकांत दिलीप तिरमले (वय-19) या बेताल तरुणा विरुद्ध तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

  

जगातील इतर अनेक देशांमध्ये हा समान आपत्कालीन क्रमांक आणीबाणी सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी दिला जातो.इतर क्रमांकांसोबत 112 सहसा उपलब्ध असतो.त्यामुळे कोणास अडचणीच्या काळात लवकर मदत प्राप्त होऊ शकते त्यातून एखाद्याची जीवितहानी टळू शकते वा अग्नी पासून सुरक्षा होऊ शकते.ही मदत भारत सरकारने उपलब्ध करून दिल्याने अनेकांना त्याचा फायदा होताना दिसत आहे.मात्र त्याचा दुरुपयोग करणारे महाभागही आढळून येत असून अशा महाभागास कोपरगाव पोलिसांनी अटक केली आहे.

  साधारण 112 हा एक फोन क्रमांक सामान्य आणीबाणीचा तथा आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक आहे जो बहुतांश मोबाईल दूरध्वनी आणि काही देशांमध्ये,आपत्कालीन सेवांपर्यंत (ॲम्ब्युलन्स,अग्निशमन आणि बचाव,पोलिस) पोहोचण्यासाठी निश्चित टेलिफोनवरून विनामूल्य डायल केला जाऊ शकतो.112 हा जी.एस.एम.(GSM) मानकाचा एक भाग आहे आणि सर्व GSM-सुसंगत टेलिफोन हँडसेट लॉक केलेले असताना किंवा काही देशांमध्ये सिम कार्ड नसतानाही 112 डायल करण्यास सक्षम आहेत.युरोपियन युनियनच्या जवळपास सर्व सदस्य राष्ट्रांमध्ये तसेच युरोप आणि जगातील इतर अनेक देशांमध्ये हा समान आपत्कालीन क्रमांक आहे.आणीबाणी सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी दिलेल्या देशात ऐतिहासिकदृष्ट्या वापरल्या जाणाऱ्या इतर क्रमांकांसोबत 112 सहसा उपलब्ध असतो.त्यामुळे कोणास अडचणीच्या काळात लवकर मदत प्राप्त होऊ शकते त्यातून एखाद्याची जीवितहानी टळू शकते वा अग्नी पासून सुरक्षा होऊ शकते.ही मदत भारत सरकारने उपलब्ध करून दिल्याने अनेकांना त्याचा फायदा होताना दिसत आहे.मात्र काही विक्षप्त तरुण त्याचा दुरुपयोग करताना दिसत असून त्यांची ही वृत्ती,’थाळा वाजवून नाग घरात घातल्या’ सारखा दाहक अनुभव चाळीसगाव येथील आरोपी तरुणाला आला आहे.तो रवंदे  येथे असताना त्याला ही दुर्बुद्धी झाली असून त्याने तेथील रहिवासी साहील राजेंद्र लामखडे यांच्या घराच्या समोर ओट्यावर बसून रात्री 11.44 वाजता हा पराक्रम केला होता.त्यात त्याने म्हंटले होते की,”आपल्याला व आपल्या दोन भावांना रवंदे येथील 15- 20 लोकांनी बांधून ठेवले असून आपला फोन हिसकावून घेतला असून चाकूचा धाक दाखवून आपल्याला मारहाण करीत आहेत” असा कॉल केल्याने पोलिसांची मध्यरात्री तारांबळ उडाली होती.त्यांनी त्या ठिकाणी तातडीने आपल्या वाहनासह धाव घेतली होती.घटनास्थळी गेल्यावर तेथे अशी कोणतीही घटना घडली नव्हती असे निष्पन्न झाले होते.त्यामुळे पोलिसांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता.परिणामी पोलिसांनी या ठगास ताब्यात घेऊन त्यास खोटी माहिती दिल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांत घेऊन आले व त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.294/2024 भारतीय दंड संहिता सन- 2023 चे कलम 217 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचेसह पोलीस हे.को.बोटे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.संदीप बोटे हे करीत आहेत.













Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close