गुन्हे विषयक
…’ त्या ‘आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी सोळा जणांवर गुन्हा ?

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी श्री क्षेत्र पांचाळे येथील अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले असल्याचा आरोप आहे.मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ प्रसारित केल्यावरून मुस्लिम सामाजात संताप व्यक्त होत असताना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील तरुण राहील शेख यास मारहाण केल्या प्रकरणी त्याने घटनेनंतर रात्री 11 वाजच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सुरेगाव,कोळपेवाडी,कोळगाव थडी आदी ठिकाणच्या सोळा जणांवर गुन्हा दाखल केला असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.

फिर्यादीस मारहाण केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास समाधान उर्फ गोल्या संजय कोळपे,तुषार राजू शिंदे,आकाश उर्फ बडक्या तुमनर,विजय संजय कोळपे,सर्व रा.कोळपेवाडी,निलेश उर्फ गणेश सोनवणे,गणेश सुभाष डहाळे,प्रज्वल चंद्रभान कोळपे,प्रकाश कोळपे,निखिल कोळपे रा.कोळपेवाडी,मछ्या मुळेकर,लखन मुळेकर रा.मोतीनगर व इतर चार ते पाच जण आदीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात एका धार्मिक कार्यक्रमात प्रवचन करताना नगर जिल्ह्यातील सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले असल्याचा आरोप आहे.मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.त्यावरून मुस्लिम सामाजात संताप व्यक्त होत आहे.
राज्यातील विविध ठिकाणी याबाबत गुन्हे दाखल झालेले असताना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील तरुण राहील शेख याचे दुकानाची तोडफोड करून त्यास खुर्च्या,लोखंडी रॉड,लाकडी दांडा आदींनी मारहाण केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास समाधान उर्फ गोल्या संजय कोळपे,तुषार राजू शिंदे,आकाश उर्फ बडक्या तुमनर,विजय संजय कोळपे,सर्व रा.कोळपेवाडी,निलेश उर्फ गणेश सोनवणे,गणेश सुभाष डहाळे,प्रज्वल चंद्रभान कोळपे,प्रकाश कोळपे,निखिल कोळपे रा.कोळपेवाडी,मछ्या मुळेकर,लखन मुळेकर रा.मोतीनगर व इतर चार ते पाच जण आदीनी फिर्यादीनुसार दुकानात जावून त्याच्या खुर्च्यांची मोडतोड करून त्याच्या चलचीत्रणाचा डी. व्हीं .आर.काढून सोबत घेऊन गेल्या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध फिर्यादीचार खाजगी रुग्णालयात जावून त्याचा जबाब नोंदवून त्यांचेवर गुन्हा क्रं.296/2024 भारतीय न्याय संहिता कलम 119(1),118(1),115(2),352,189,(2),191(2),191(3),190,351(2) 351(3),324(4)(5) आदी कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान सदर प्रकरनात पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुकणे मॅडम या करीत आहेत.