गुन्हे विषयक
…आता कोपरगाव शहर पोलिस ठाण्यास घेराव ?
न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
आ.अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज कोपरगाव शहर आणि तालुक्यात उमटले असून आज महंत रामगिरिजी महाराज यांच्या शिष्यगणानी शहर पोलिस ठाण्यास घेराव घातला असून वातावरण तंग बनले असल्याचे दिसून येत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी श्री क्षेत्र पांचाळे येथील अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले असल्याचा आरोप आहे.मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.त्यावरून मुस्लिम सामाजात संताप व्यक्त होत आहे.त्यातच भरीस भर म्हणून आज एका वृत वाहिनीवर अजित पवार गटाचे प्रवक्ते आ.अमोल मिटकरी यांनी महंत रामगिरिजी महाराज यांचेवर वादग्रस्त विधाने केल्याने आगीत तेल ओतले गेले आहे त्याचे पडसाद कोपरगाव तालुक्यात महंत रामगिरिजी महाराज यांचे शिष्य वर्गात उमटले आहे.त्यातून अनेक भाविकांनी आज कोपरगाव शहर पोलिस ठाण्यास घेराव घालत आ.मिटकरी यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली व शहर पोलिस ठाण्यास घेराव घातला.
ह.भ.प.परशुराम महाराज अनर्थे,मधुसूदन महाराज,दादा महाराज टुपके आदींसह बहुसंख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
त्यावेळी पोलीस ठाण्यावर बराच काळ चर्वितचर्वण सुरू होते.मात्र कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे गैरहजर होते.त्यावेळी श्रीरामपूर येथे बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी परिस्थिती हाताळण्याचे काम करताना दिसत होते.मात्र बराच वेळ उलटूनही त्यांना यश येताना दिसत नव्हते.त्यामुळे त्यांनी आज सहा वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या समोर भजने गात निषेध व्यक्त करण्याचे आंदोलन सुरू केले आहे.
आता या नंतर कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी काय भूमिका घेणार याकडे शहर आणि तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.