जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महंत रामगिरीजी महाराज यांचेवर पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट,तरुणास बदडले ?

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी श्री क्षेत्र पांचाळे येथील अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले असल्याचा आरोप आहे.मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.त्यावरून मुस्लिम सामाजात संताप व्यक्त होत आहे.कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील घटनेनंतर आज सकाळी 11.30 वाजता सुरेगाव येथील मुस्लिम तरुण राहील एजाज शेख (वय -27) याने आपल्या व्हॉट्सअँप स्टेटसवर महंत रामगिरी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने त्यास आज एका टोळक्याने मारहाण केली असून या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती हाती आली आहे.

  

दरम्यान जखमी युवक राहील शेख यास उपचारार्थ कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात भरती केले असून त्यावर उपचार सुरू आहे.त्याला डोक्याला व हातास गंभीर दुखापत झाली असलेली माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात एका धार्मिक कार्यक्रमात प्रवचन करताना नगर जिल्ह्यातील सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले असल्याचा आरोप आहे.मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.त्यावरून मुस्लिम सामाजात संताप व्यक्त होत आहे.नाशिक,छत्रपती संभाजीनगर नंतर काल नगर जिल्ह्यातही मुस्लिमांनी आंदोलन केले.नगर शहर व राहाता येथे शुक्रवारी दुपारी शेकडो मुस्लिमांनी रस्त्यावर येत ‘रास्तो रोको’ आंदोलन केले होते.राहाता,वैजापूर आदी ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याच्या बातम्या आहेत.कोपरगाव तालुका त्यास अपवाद ठरला नाही.काल सकाळी तालुक्यातील धोत्रे येथील एका अल्पवयीन युवकाने महंत रामगिरीजी महाराज यांनी केलेल्या विधानावर आपल्या ‘व्हॉट्सअप स्टेटस’वर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.त्याचे पडसाद उमटण्यास वेळ लागला नाही.त्याबाबत एका रामगिरीजी महाराज समर्थक इसमाने याचे कान उपटले असता त्या अल्पसंख्याक समाजाच्या मुलास त्याच्या समाजाच्या एका ज्येष्ठ इसमाने याबाबत त्या मुलास समज दिली होती.ते प्रकरण मिटले असताना आज सकाळी 11.30 वाजता कोपरगाव शहराच्या पश्चिमेस साधारण वीस किं.मी.अंतरावर असलेल्या सूरेगाव ग्रामपंचायत हद्दीत तरुण राहील शेख यानेही असाच प्रताप केला होता.त्याचे पडसाद उमटले होते व कोळगाव थडी येथील काही तरुणांनी त्यास समज दिली होती.काही काळाने त्याने  न ऐकल्याने त्यास भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केली होती.मात्र त्याने या बाबत ऐकले नाही परिणामी या तरुणांनी आज त्याच्या सुरेगाव येथील त्याच्या सलूनच्या दुकानावर हल्ला केला असून त्याची मोडतोड केली आहे व त्यास भर चौकात चोप दिला आहे.या प्रकरणी तेथील सरपंच यांचे नातेवाईक यांनी या संबंधी वाद मिटविला होता.

    दरम्यान ही घटना कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कळली होती.पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी तातडीने आपल्या सहकाऱ्यांना घेऊन जाऊन सदर ठिकाणी शांतता स्थापित करण्यात यश मिळवले आहे ते परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे.आज उशिरा रात्री सदर सात ते आठ आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान सूरेगाव आणि परिसरात वातावरणात तणावपूर्ण शांतता आहे.

दरम्यान जखमी युवकास कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात भरती केले असून त्यावर उपचार सुरू आहे.त्याला डोक्याला व हातास गंभीर दुखापत झाली असलेली माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close