गुन्हे विषयक
गोरक्षक दलाच्या तालुकाध्यक्षांसह दोघांवर हल्ला,चार अटक !
न्यूजसेवा
कोपरगाव – (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील गोरक्षक समितीचे अध्यक्ष मयूर विधाटे याचे घरावर स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी शहरातील सुमारे 150- 200 असामाजिक तत्वांनी हल्ला चढवला असून त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांच्या आई वरही हल्ला करून त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मनी मंगळसूत्र ओरबाडून घेतले असल्याचा आरोप केला आहे.मात्र या हल्ल्याचा गुन्हा दाखल करताना मात्र केवळ आठ जनांवर केला असल्याचा आरोप हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात वातावरण तंग बनले असून शहर पोलीस या बाबत दक्षता घेत आहे.दरम्यान या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकावर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.यातील आठ जनापैकी चार जण अटक केले असून बाकी फरार आहेत.
महाराष्ट्रात नऊ वर्षा पूर्वी भाजप सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला होता.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केली होती.तोपासून ‘गोहत्या’ हा दंडनीय अपराध मानला जात आहे.गोहत्या करणार्या गुन्हेगाराला कठोर शिक्षाही होण्याची तरतूद आहे.गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्याची मागणी सातत्याने होत होती.मात्र नऊ वर्षांनी आज चित्र पहिले तर हा कायदा खरेच उपयक्त ठरला का असा सवाल निर्माण झाला आहे.कारण अशा घटना वारंवार उघड होत आहे.कोपरगाव या घटना होऊ नये यासाठी हिंदुत्ववादी संघटना दक्षता घेत असून गोरक्षक समिती त्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहे.मात्र आता त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.अशीच घटना कोपरगाव शहरात घडली असून मयूर विधाते यांनी सोमवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी येवला नाक्यावर काही असामाजिक तत्वांची गोवंश घेऊन जाणारी वाहने अडवली होती त्याचा राग मनात यातील प्रमुख आरोपी साहिबाज अकबर शेख याने दत्तनगर येथे गैर कायद्याची मंडळी जमवून मयूर विधाते यास,”तू.आमच्या जनावरांच्या गाड्या का अडवून पोलिसांना का धरून देतो” असा जाबसाल करून त्यास शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व त्यास घरासमोर जावून लोखंडी रॉडने मारहाण केली ते माराच्या भीतीने घरात पळाले असता त्यास घरात घुसून घराचे बाहेर ओढून आणले व त्यास शेख याने व वासिम जावेद शेख यांनी खाली पडलेल्या विधाते यास विटाने मारहाण केली व जखमी केलं आहे.शिवाय घरावर दगडे फेकून दहशत केली असल्याची बाब उघड झाली आहे.या प्रकरणी जखमी मयूर विधाते याची आई शैला माणिक विधाते (वय -46 ) यांनी शहर पोलीस ठाण्यात आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान यात भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या वाल्मीक जाधव यांना या आरोपींनी मारहाण केली आहे.यात आणखी आरोपी शरीफ पठाण,दत्तनगर,इरफान शेख,शरीफ शेख,अमीर उर्फ मद्या सलीम सय्यद ,(वय -23 ) अर्शद शब्बीर शेख,(वय -22 ) अमन सलीम पठाण,(वय -20 )यांचा सहभाग आढळून आला असल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तर यातील आरोपी वसीम शेख,अमीर सय्यद,अर्शद शेख,अमन पठाण आदी चार जणांना अटक केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान दिनांक 14 ऑगस्टच्या रात्री 09.20 वाजता त्यांच्या घरावर हल्ला चढवला होता.त्यांनी गोरक्षक समितीचे तालुका अध्यक्ष मयूर विधाते यांना हानमार केलीच पण तेथे उपस्थित त्यांच्या आईवर हल्ला केला असल्याचा दावा संघटनांनी करून त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे मंगळसूत्र ओरबाडून घेतले असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव गुन्हा दाखल केल्यावर त्यांना पुन्हा घरी येऊन सदर गुन्हा मागे घेण्याची धमकी देऊन तो मागे न घेतल्यास तुमचे हात पाय तोडू व तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचा दावा आपल्या निवेदनात केला आहे.
दरम्यान यात कोपरगाव शहर पोलिसांनी या आठ आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.346/2024 भारतीय न्याय संहिता कलम 118(1),125,189,(2),190,191(2).324(4),333,351,(2),352,प्रमाणे वाढीव कलम 110 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अटक आरोपींना पोलिसांनी अतिरिक्त न्या.भगवान पंडित यांचे संमोर हजर केले असता त्यांना पोलिसांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.न्यायलयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान एका माहितीनुसार मयुर विधाटे यांनी साधारण एक महिन्यापूर्वी नगर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला व शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांना निवेदन देऊन देऊन हल्ला होणार असल्याचा संशय व्यक्त करून उपाय योजना करण्याची मागणी केली होती.मात्र त्याची वेळेवर दखल घेतली नाही.त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान या गुन्ह्याची गंभीरता पाहता पोलिसांनी सदर गुन्ह्यातील 150 -200 आरोपींना तातडीने अटक करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली असून मुंबई मध्ये पंधरा दिवसापूर्वी भर रस्त्यात अशीच एका गोरक्षकाची हत्या केली असल्याची आठवण करून दिली आहे.गोरक्षांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचेवर दबाव निर्माण करण्याचे कट कारस्थान केले जात असल्याचा आरोप केला आहे व पोलीस अशा हल्ल्याची वाट पाहत आहे का असा सवाल केला आहे.आगामी तीन दिवसात पोलिसांनी वरील आरोपीवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अन्यथा हिंदू समाज कोपरगाव व नगर जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा शेवटी दिला आहे.दरम्यान या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याची महिती हाती आली आहे.मात्र याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही.
दरम्यान या निवेदनाच्या प्रती राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस,जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक,शिर्डी पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी,तहसीलदार कोपरगाव आदींना निवेदनाच्या प्रती पाठवल्या आहेत.कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नये असे आवाहन शेवटी केले आहे.सदर निवेदनावर कलविंदरसिंग दडियाल,कुलदीप गणेशसिंह ठाकूर,दिपक बाबुराव सिनगर आदींनी सह्या केल्या आहेत.आता शहर पोलीस अधिकारी काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.