जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ,साडेचार लाखांचा ऐवज लंपास !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव – (नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील येवला रस्त्यालगत रहिवासी असलेल्या मात्र शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत वंदना अशोक थोरात (वय – 42 ) यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे 4.50 लाख रुपयाचे विविध दागिने लंपास केले असून या शिवाय भाऊसाहेब नामदेव थोरात यांच्या घरातून सहा ग्रॅम सोन्याची पोत लंपास केली असून त्यांनी त्या ठिकाणी घराची उचक-पाचक करत जेवणावर ताव मारला असल्याचे निष्पन्न झाले असून घराजवळच सौच करून पोबारा केला असल्याने जवळाके आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

  

“कोपरगाव तालुक्यातील नैऋतेकडिल दुष्काळी तेरा गावांना शिर्डी पोलीस ठाणे दूरस्थ पडत असल्याने चोरट्यांचे फावत असल्याचे दिसून येत असून परिणामी उत्तोरोत्तर गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे या गावांना मंजूर पोलीस आऊट पोस्ट जवळकें येथील चौफुलीवर त्वरित मंजूर करून सुरू करावे”- सारिका विजय थोरात,सरपंच,जवळके ग्रामपंचायत,ता.कोपरगाव.

  

वंदना अशोक थोरात यांच्या घरातील कपाटाची चोरी नंतर झालेली दुरवस्था दिसत आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”आगामी काळात दुष्काळाचे सावट दिसू लागल्याने चोरट्यांनी हात उचलून घेतल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना आज पहाटे उघडकीस आली आहे.कोपरगाव तालुक्याच्या नाजिक असलेल्या संगमनेर हद्दीत चिंचोली शिवारात गत सप्ताहात चोरट्यांनी आपल्या लीला मोठया प्रमाणात दाखवल्या असताना आता त्यांची वक्रदृष्टी शेजारी असलेल्या कोपरगाव तालुक्याच्या नैऋतेकडील गावावर पडली असल्याचे दिसून येत आहे.त्यांनी आज पहाटे जवळके हद्दीत जुना येवला रोड लगत रहिवासी असलेल्या व आशासेविका म्हणून कार्यरत असलेल्या वंदना अशोक थोरात व अशोक रेवजी थोरात यांचे घराचा रात्री ०2 वाजता कडी कोयंडा तोडून कपाटात असलेले अडीच तोळे मोहन माळ,दिड तोळ्याची अंगठी,एक तोळ्यांचे लॉकेट,सात ग्रॅमचे झुबे,तीन ग्रॅमचे डोर्ले,चार ग्रॅम सोन्याचे मणी,तेराशे रुपयांच्या तोरड्या आदी चार लाख ५५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.वंदना थोरात यांचे पती सप्ताहात गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी पाळत ठेवून ही करामत केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाऊसाहेब थोरात यांच्या कपाटाची अशी मोडतोड करून चोरट्यांनी आपले साध्य साध्य केले आहे.

   दरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यावर कपाटातील सर्व ऐवज ताब्यात घेतल्यावर त्यांनी शेवटी वंदना थोरात यांच्या गळ्यातील सोन्याच्या पोथिवर डल्ला मारताना त्यांना जाग आली असता त्यांनी आपल्या मुलास उठवले होते.त्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला होता.चोरटे चार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यानंतर त्यांनी सरपंच सारिका थोरात यांचे पती विजय थोरात यांना ही बाब कळवली त्यानंतर त्यांनी व पोलिस पाटील यांनी गावातील वस्तीवरील शेतकऱ्यांना दूरध्वनी करून जागे केले असल्याचे पुढील अनर्थ टळला असला तरी चोरट्यांनी वंदना थोरात यांचे वस्ती शेजारी असलेल्या त्यांच्या चुलत दिर भाऊसाहेब नामदेव थोरात यांच्या कपाटातील पाच ग्रॅमची सोन्याची पोत,लंपास केली आहे.

   या शिवाय उपसरपंच सुनील वामन थोरात यांच्या घराची झाडाझडती घेतली असल्याचे उघड झाले आहे.तर दशरथ रुंजा थोरात यांचे वस्तीजवळ ते भाऊसाहेब थोरात यांचे वस्ती जवळ चोरटे दारू प्यायला बसले असल्याचे निदर्शनास आले असून त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहे.

   दरम्यान सदरची घटना शिर्डी पोलिसांना पोलीस पाटील सुधीर थोरात यांनी कळवली असता पोलीस सदर घटनास्थळी पोलीस पहाटे चार वाजता आले होते.तर पंचनामा आज सकाळी १० वाजता केला आहे.दरम्यान शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी नगर येथून श्वान पथकास पाचारण केले होते.त्यात त्यांनी वस्तीच्या पूर्वेस साधारण एक कि.मी.पर्यंत बिरोबा मंदिरापर्यंत  माग काढला असला तरी तेथून पुढे चोरट्यांनी वाहनाचा उपयोग केला असल्याची शक्यता आहे.
   दरम्यान पोलिसांनी फिंगर प्रिंट उपलब्ध झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.दरम्यान वंदना अशोक थोरात (वय-४२),भाऊसाहेब थोरात यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शिर्डीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत बाल्या,पो.हे.को.गोरणे आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.श्री गोराने हे करीत आहेत.

   दरम्यान कोपरगाव तालुक्यातील नैऋतेकडिल तेरा गावांना शिर्डी पोलीस ठाणे दूरस्थ पडत असल्याने चोरट्यांचे फावत असल्याचे दिसून येत असून परिणामी उत्तोरोत्तर गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे या गावांना मंजूर आऊट पोस्ट जवळकें येथील चौफुलीवर त्वरित मंजूर करून सुरू करावे अशी मागणी जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close