जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

सरकारी अधिकाऱ्याला दमदाटी,गुन्हा दाखल !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी) 

  कोपरगाव तहसिल कार्यालयात असलेल्या पुरवठा विभागात काम करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यास,”मी,आणलेली कामे तुम्ही का करत नाही  ? असा सवाल करुन,”तू” येथे नोकरीं कशी करतो तेच बघतो” अशी धमकी देऊन विशाल साहेबराव आव्हाड याने शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी अधिकारी चंद्रकांत नानासाहेब चांडे यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.सदर घटना शनिवारी तीन तारखेला सायंकाळी घडली आहे.या घटनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांना बाहेरील एजंट चा होत असलेला त्रास चव्हाट्यावर आला आहे.महसूल कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

आरोपीने आपल्याला “तू मी आणलेली कामे का करत नाही ? म्हणून जाब विचारू लागला.आपण त्याला समजावले परंतु तो माझ्या टेबलावर बसून मला दमदाटी करून,”माझी कामे वेळेत झाली पाहिजे नाही तर तू येथे कशी नोकरी करतो तेच पहातो,तुला कामालाच लावतो” अशी धमकी देऊन मला शिविगाळ केली आहे.असा दावा फिर्यादी अधिकारी यांनी केला आहे.



   कोपरगाव तहसिल कार्यालयात नुकताच बनावट जातीचे दाखले देणारे रॅकेट उघड झाले आहे.तहसील कार्यालयात अनेक कामे प्रलंबित राहत असल्याने नागरिकांना विनाकारण चकरा माराव्या लागत असून त्यातून अनेक वेळा तंटे बखेडे उद्भवत असताना दिसत आहे.पुरवठा विभागात अनेक कामे प्रलंबित राहत असून रेशन संबंधी एप चालत नसल्याने अनेक तक्रारी होताना दिसत आहे.त्यातच या परिसरात दलालाची बरीच चलती असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे बऱ्याच वेळा नागरिकांची सहनशीलता संपताना दिस्त आहे.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून या संबंधी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अधिकारी चंद्रकांत नानासाहेब चांडे यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


दरम्यान सदर फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की,” मी 28 सप्टेंबर 2019 पासून पुरवठा निरीक्षक म्हणून तहसील कार्यालयात कार्यरत आहे.विशाल साहेबराव आव्हाड हा आमच्या खात्यासंदर्भात वेगवेगळी कामे घेवून येत असतो म्हणून माझी ओळख आहे.नेहमी प्रमाणे मी माझ्या कार्यालयात काम करत असताना 3 ऑगस्ट रोजी रोजी सायंकाळी सात वाजता आव्हाड आला व तो माझेशी उद्धट वागला व मला अरेरावी करून,” तू मी आणलेली कामे का करत नाही ? म्हणून जाब विचारू लागला.आपण त्याला समजावले परंतु तो माझ्या टेबलावर बसून मला दमदाटी करून,”माझी कामे वेळेत झाली पाहिजे नाही तर तू येथे कशी नोकरी करतो तेच पहातो,तुला कामालाच लावतो” अशी धमकी देऊन मला शिविगाळ केली व मला सरकारी कामात अडथळा आणला त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचा आरोप फिर्यादी ने केला आहे.

    दरम्यान आपण आव्हाड यास,” तू टेबलाच्या खाली उतर,मला सरकारी काम करू दे” असे समजावले परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता यावेळी पुरवठा विभागात हजर असलेले प्रविण काजळे,प्रताप फरताळे,सुशील रांजवणे,लामखडे असे तेथे होते त्यांनीही आव्हाड यास समजावले सदर इसम ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.आपण ही माहिती संबधित तहसीलदार यांना दिली आहे.त्यात त्याने मला शिव्या देवून दमदाटी केली असल्याचे सांगितले आहे.त्याने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणून आपण आव्हाड यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 221,352,351(२) प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल श्री कोरेकर पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close