जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

एकाचा गळफास,पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संवत्सर शिवारात लक्ष्मणवाडी जवळ दौंड मनमाड रेल्वे मार्गावर सात दिवसापूर्वी दुपारी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला असताना आज पुन्हा टाकळी हद्दीत एक आत्महत्येची घटना समोर आली असून यातील तरुण नितीन शांताराम वाणी (वय -३९)याने गळफास घेऊन आपले जीवन यात्रा संपली असल्याची दुर्दैवी घटना उघड झाली आहे त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी भागवत पोपट वाणी यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

“मयत नितीन वाणी याने दि.२७ जुलै रोजी सकाळी ७.३० पूर्वी कधीतरी धारणगाव शिवारातील गट क्रं.६६/३ मधील पत्र्याचे शेड मध्ये किरण शंकरराव दंडगव्हाळ यांचे मालकीचे वरील गट क्रमांक मध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने शनिवारी सकाळी ७.३० पूर्वी कधीतरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.

   यापूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संवत्सर शिवारात लक्ष्मणवाडी जवळ दौंड मनमाड रेल्वे मार्गावर सात दिवसापूर्वी दुपारी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता मात्र नंतर तो कोकमठाण येथील रक्ताटे याचा असल्याचे उघड झाले होते.घरातील अंतर्गत वादात ही घटना घडली असल्याचे बोलले जात असताना त्यानंतर सतरा दिवसात कोपरगाव तालुक्यात ही दुसरी आत्महत्या उघड झाली आहे.

    यातील खबर देणार भागवत पोपट वाणी यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की,”दि.२७ जुलै रोजी सकाळी ७.३० पूर्वी कधीतरी सदर तरुणाने धारणगाव शिवारातील गट क्रं.६६/३ मधील पत्र्याचे शेड मध्ये किरण शंकरराव दंडगव्हाळ यांचे मालकीचे वरील गट क्रमांक मध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने शनिवारी सकाळी ७.३० पूर्वी कधीतरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.मात्र यातील मयताने आपली जीवन यात्रा का संपवली याचे कारण अद्याप निष्पन्न झालेले नाही.
  दरम्यान यातील मयत हा टेलरिंग आणि वाट्याने शेती करत असल्याची माहिती हाती आली आहे.त्याच्या पश्चात वडील,पत्नी,भाऊ,मुले असा परिवार असल्याची माहिती हाती आली आहे.

  या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंदणी क्रं.३९/२०२४ भारतीय नागरिक सुरक्षा सहिंता कलम १९४ प्रमाणे नोंद दाखल केली आहे.

    दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी,पोलीस उप निरीक्षक महेश कुसारे,यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक कुसारे हे करीत आहेत.दरम्यान या घटनेने टाकळी आणि परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close