गुन्हे विषयक
शहरात ९.७० लाखांची चोरी,तालुक्यात खळबळ,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील कोर्ट रोड हरिजन कॉलनीत काल रात्री दहा वाजेनंतर कधीतरी अज्ञात चोरट्यांनी राहत्या घरावर पाळत ठेवून घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून किचन ओट्याच्या खाली ठेवलेली ०९ लाख ७० हजार ७०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली लोखंडी पेटी चोरून नेली असल्याचा गुन्हा फिर्यादी महिला मालती रुपेश हाडा (वय – ४२) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिला ही आपले नियमित कर्म आटोपून झोपी गेलो असता अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूने दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील किचनच्या खोलीत प्रवेश करून त्यात किचनचा ओट्याखाली ठेवलेले लोखंडी पेटीत सुमारे ९ लाख ७० हजार ७०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असलेली पेटी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी घरफोडी करून चोरून नेले आहे.
सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरीचा शोध घेतला असता पोलिसांना मागील पंधरवाड्यात पोलिसांनी जवळपास २७ दुचाकी चोरणारी टोळी गजाआड केली असून त्याबाबत नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असताना दि.०९ जुलै रोजी रात्री १० वाजे नंतर अज्ञात चोरट्यांनी मारुती डिझायर ही तीन लाखांची गाडी चोरी झाली असताना आज मुर्षतपूर शिवारात शिवरोड,म्हसोबानगर येथे एक चोरी उघडकीस आली होती त्यानंतर मध्ये शांतता असताना आज पुन्हा एक चोरीचे प्रकरण उघड झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी महिला मालती हाडा यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यांनी म्हंटले आहे की,दि.२५ जुलै २०२४ रोजी आपले नियमित कर्म आटोपून झोपी गेलो असता अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूने दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील किचनच्या खोलीत प्रवेश करून त्यात किचनचा ओट्याखाली ठेवलेले लोखंडी पेटीत सुमारे ९ लाख ७० हजार ७०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असलेली पेटी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी घरफोडी करून चोरून नेले आहे.
या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.३२९/२०२४ भारतीय न्याय सहिंता कलम ३३१(४)३०५(अ) प्रमाणे दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भुमरे,यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस हे.कॉ.बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.दरम्यान त्या चोरीचे कोपरगाव शहर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.