जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…शहरात चोरीचे सत्र सुरू,नागरिकांत भीती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरगाव शहरात मागील वर्षी मे महिन्यात एकाच रात्री तीन कारच्या चोऱ्या झाल्या असताना व त्यांचा अद्याप तपास लागलेला नसताना काल रात्री फिर्यादी सेवानिवृत्त कर्मचारी अशोक श्रीमंत सोनवणे (वय-६८) यांची ०३ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर (क्र.एम.एच.१७ ए.झेड.८५२०) कार चोरी गेली असल्याचा गुन्हा त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेला आहे.त्यामुळे शहरातील वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

  गतवर्षी चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक-दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायरसह दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून आपला प्रताप दाखवला होता.त्या चोरट्यांचा व गाड्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

    सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले असून राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिला का असा सवाल निर्माण झाला आहे.नाही म्हणायला मागील पंधरवाड्यात पोलिसांनी जवळपास २७ दुचाकी चोरणारी टोळी गजाआड केली असून त्याबाबत नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.मात्र पुन्हा एकदा चोरट्यांनी उचल खाली असून काल दि.०९ जुलै रोजी रात्री १० वाजे नंतर अज्ञात चोरट्यांनी शहर पोलिसांना,’आपली हात की सफाई’ दाखवली असल्याने पुन्हा एकदा वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

   दरम्यान या बाबत फिर्यादी इसम अशोक सोनवणे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण सेवानिवृत्त असून येवला रोडवर श्रीनगर येथे रहिवासी आहे.आपण मंगळवार दि.०९ जुलै रोजी रात्री १० वाजता आपली मारुती स्विफ्ट डिझायर ही गाडी क्रमांक (एम.एच.१७ ए.झेड.८५२०) ही आपल्या घरासमोर उभी करून झोपलो असता दुसऱ्या दिवशी सकाळी ०७ वाजता उठून पाहिले असता सदर क्रमांकाची मारुती कार आपल्याला घरासमोर दिसली नाही.आपण तिचा शोध घेऊन पाहिला असता ती इतरत्र मिळून आली नाही.त्यामुळे आपली खात्री झाली की अज्ञात चोरट्याने आपल्या आर्थिक फायद्यासाठी आपली चार चोरून नेली आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेसह पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पो.हे.कॉ.आर.पी.पुंड यांनी भेट दिली आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३९२/२०२४ नवीन बी.एन.एस.कलम ३०३(२) अन्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमख यांचे मार्गदशनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close