गुन्हे विषयक
विविध गुन्ह्यातील आरोपीचे निधन !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव हद्दीत रहिवासी असलेला व गंभीर गुन्ह्यातील आरोपी चांगदेव भारम भोसले (वय-४१) यांचे नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे.
स्व.चांगदेव भारम भोसले याच्यावर व त्याच्या मुलावर अनेक गुन्हे काही वर्षापुवी दाखल होते.पढेगावात दोन गटातही मोठा वाद निर्माण झाला होता.त्यातून ऐन दिवाळीत मोठा शिमगा झाला होता.त्यात अनेक ग्रामस्थ यात अडकले होते.तर यातील भोसले यांच्या गटाचे काही आरोपी अडकले होते.हा वाद त्यावेळी राज्यभर गाजला होता.त्या नंतरही अनेक गुन्हे या बापलेकावर दाखल होते.मात्र या वादानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी श्रीगोंद्या पाठोपाठ वारंवार बैठका घेऊन पारधी समाजात मोठी जागृती घडवली होती.तर चलचित्रण यंत्रणा निर्माण करून त्यांना होणाऱ्या नाहक त्रासातून सुटका केली होती;त्यातून या समाजातील अनेक तरुण व शेती व्यवसायात उतरले होते.त्यातून त्यांचे गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले होते.
दरम्यान मागील महिन्यात मयत चांगदेव भोसले व त्याच्या मुलात वाद निर्माण झाला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यातून उपचारार्थ चांगदेव भोसले यास संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.त्यात उपचार सुरू असताना त्याचे दि.२२ मे रोजी सायंकाळी ६.४५ वाजता त्याचे निधन झाले आहे.त्याआधी मयताच्या मुलाचे दुर्दैवी निधन झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंदणी छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली होती.त्या नंतर हा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता.दरम्यान अद्याप या बाबत शवविच्छेदन करून त्याचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे.त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.त्यात सदर चांगदेव भोसले याच्या मृत्यूचे कारण निष्पन्न होणार असल्याचे माहिती हाती आली आहे.
दरम्यान या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंदणी क्र.२६/२०२४ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एन.एस.शेख हे करीत आहेत.