जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध वाळू उपसा वाढला,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीस प्रतिबंध असतांना वारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी नदी पात्रातून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी अवैध वाळू उपसा करून तो नेत असताना आरोपी किरण शांताराम लासुरे  (वय-२६) याचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसांनी त्याचा ट्रॉलीसह पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर आणि त्यातील वाळू असा ०३ लाख १० हजाराचा अवैज जप्त केला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दोन्ही संग्रहित छायाचित्रे.

  

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव,सांगवी परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा ही अवैध वाळू बंद करण्याची मागणी करूनही महसूल यंत्रणेवर कोणताही परिणाम झालेला नाही हे विशेष ! उलट संबंधित यंत्रणांनी हे कॅमेरे बंद करून किंवा ते फिरवून चालुच ठेवली असल्याचे दिसून आले आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात वारी गावात उघड झाली आहे.

राज्यातील वाळू लिलाव व बेकायदा वाळू उपसा यामागील राजकारण व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नवे वाळू धोरण दि.०१ मे २०२३ पासून हाती घेतले होते.त्याची अंमलबजावणी होण्यास काही महिने लागले ती काही महिने झाले नाही तोच सरकारने आचारसंहिता लागण्या आधी वाळूचे दर बेसुमाररित्या वाढवले असून आत अधिकृत वाळू जवळपास ४ हजार ५०० रुपया पर्यंत पोहचली आहे.यात सामान्य माणसाला सलवतीच्या दरात वाळू मिळण्याचे स्वप्न हे दिवास्वप्न ठरले आहे.त्यात लाभार्थ्यांच्या ऐवजी संबंधित मंत्री आणि महसुली अधिकाऱ्यांची चांदी झाल्याचे दुर्दैवाने नागरिकांना पाहायला मिळाले आहे.व सहाशे रुपये दराची वाळू हि दिवास्वप्न ठरले असल्याने नागरिकांत मोठी नाराजी आहे.त्यामुळे स्वाभाविकच चोरटी वाळूस बळ मिळाल्याचे दिसून येत आहे.कोपरगाव,राहाता तालुका त्यास अपवाद नाही.त्यामुळे वाळू डेपो आणि उपसा केंद्राच्या ठिकाणी चोरटी वाळू मोठ्या प्रमाणावर होत आहे.त्यासंबंधी सुरेगाव,सांगवी परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा ही वाळू बंद करण्याची अनेकवेळा निवेदने आणि लेखी इशारे देऊनही कोणताही परिणाम झालेला नाही हे विशेष ! उलट संबंधित यंत्रणांनी हे कॅमेरे बंद करून किंवा ते फिरवून चालुच ठेवली असल्याचे दिसून आले आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात वारी गावात उक्कडगाव देवी मंदिरासमोर उघड झाली असून यातील शिंगवे येथील रहिवासी असलेला आरोपी किरण लासुरे याने आपल्या ०३ लाख रुपये किमतीचा विना क्रमांकाचा पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरसह ट्रॉलीच्या सहाय्याने ही चोरी केली आहे.त्या ट्रॉलीतील १० हजार रुपये किमतीची ०२ ब्रास वाळू जप्त केली आहे.सदर घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार ए.आर.वाघूरे यांनी भेट दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी पो.कॉ.अंबादास रामनाथ वाघ यांनी गुन्हा क्र.१९७/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वाखुरे हे करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close