गुन्हे विषयक
पुरवठा अधिकाऱ्याची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तहसील विभागातील पुरवठा अधिकारी व नगर येथील भिंगार उपनगरातील कायम रहिवासी असलेले दिपक मच्छीन्द्र भिंगारदिवे (वय-४६) यांनी आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांच्या रजेनंतर ते आज सकाळी ते कामावर हजर झाले होते.ते कामावर आल्यावर त्यांची अस्वस्थता जाणवत असल्याचेही माहिती स्थानिकांकडून समजत असून थोड्या वेळात त्यांना त्या ठिकाणी उलट्या सुरु झाल्या होत्या.त्याची दखल घेऊन तेथील हमाल व अन्य पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने कोपरगाव बस स्थानकासमोरील डॉ.मुळे हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ भरती केले असता हि दुर्दवी घटना घटना घडली आहे.

स्व.दिपक मच्छीन्द्र भिंगारदिवे हे अ.नगर येथील भिंगार येथील मूळ रहिवासी होते.त्यांची महसूल विभागात निवड झाली होती.त्यांनी या पूर्वीही काही वर्षांपूर्वी कोपरगाव तहसील कार्यालयात आपले कर्तव्य बाजवले होते.गत दोन दिवसापूर्वी त्यांनी दोन दिवस रजा टाकून आपल्या सोलापूर येथील नातेवाईकांना भेटण्यास ते गेले होते.व आज सकाळी ते कामावर हजर झाले होते.ते कामावर आल्यावर त्यांची अस्वस्थता जाणवत असल्याचेही माहिती स्थानिकांकडून समजत असून थोड्या वेळात त्यांना त्या ठिकाणी उलट्या सुरु झाल्या होत्या.त्याची दखल घेऊन तेथील हमाल व अन्य पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने कोपरगाव बस स्थानकासमोरील डॉ.मुळे हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ भरती केले होते.त्या ठिकाणी उपस्थित असललेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी हि बाब त्यांच्या पत्नीस कळवली होती.त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली होती.त्यावेळी उपस्थितांना त्यांच्यात किरकोळ वाद असल्याचे समजत असून त्यातून एवढा टोकाचा निर्णय त्यांनी का घेतला ? असा सवाल निर्माण झाला आहे.तर मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून महसूल विभागात परिचित होते.
दरम्यान उपचार सुरु होण्याच्या दरम्यान ते कोमात गेले असल्याची माहिती हाती आली असून घटनास्थळी महसुलचे अधिकारी संदीप भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे,मात्र उपयोग झाला नाही त्यांची प्राणज्योत मालवली आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दरम्यान त्यांच्या पश्चात एक आई,भाऊ,तीन बहीणी,पत्नी,मुलगा,एक मोठी मुलगी असा परिवार आहे.दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.घटनास्थळी उंदीर मारण्याच्या औषधांची बाटली सापडली असून स्थळ पंचनामा करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान त्यावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद क्रं.२९/२०२४ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद दाखल करण्यात आली आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,सहाय्यक पो.नि.विश्वास पावरा आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स,पो.नि.पावरा हे करीत आहेत.