जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

जाण्यायेण्याच्या रस्त्यावरून तुफान हाणामारी,तीन जखमी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील कारवाडी शिवारात शेतात जाण्यायेण्याच्या रस्यात शेड बांधल्याचे कारणावरून दोन गटात गजाने तुफान हाणामारी झाली असून यात संतोष पंढरीनाथ रक्ताटे,राजेंद्र पंढरींनाथ रक्ताटे,विमल राजेंद्र रक्ताटे आदी तीन जण गंभीर जखमी झाले आहे.या प्रकरणी आरोपी भागीनाथ मुरलीधर रक्ताटेसह मुलगा पत्नी आदी तीन जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

वर्तमानात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक रब्बी पिके काढण्याचे काम सुरु आहे.आपली पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांना एकमेकाच्या बांधावरून जाण्याचे प्रसंग उदभवत असताना त्यात काही समजदार असतात तर काही समजून घेण्याचे नाव घेत नाही परिणामी अनेक दिवसांची खदखद बाहेर पडून त्यातून गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे निर्माण होत आहे.त्याचे प्रत्यंतर नुकतेच आले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक रब्बी पिके काढण्याचे काम सुरु आहे.आपली पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांना एकमेकाच्या बांधावरून जाण्याचे प्रसंग उदभवत असताना त्यात काही समजदार असतात तर काही समजून घेण्याचे नाव घेत नाही परिणामी अनेक दिवसांची खदखद बाहेर पडून त्यातून गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे निर्माण होत आहे.अशीच शेड रस्त्यात बांधणेची घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात कारवाडी कोकमठाण येथे उघड झाली आहे.

   या बाबत फिर्यादी शेतकरी संतोष पंढरीनाथ रक्ताटे (वय-४९) यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे की,”वरील साक्षिदार व आरोपी भागीनाथ मुरलीधर रक्ताटे त्यांचा मुलगा अमोल रक्ताटे पत्नी पुष्पा रक्ताटे आदीना आपण दि.१० मार्च २०२४ रोजी सकाळी ०९ वाजेच्या सुमारास आपण ते रस्त्यात शेड बांधत असल्याने व त्याने रस्ता बाधित होत असल्याने आपण त्यास हरकत घेतली व “तुम्ही रस्त्यात पत्र्याचे शेड बांधत असून त्याने आमची अडचण होणार आहे”असे म्हटल्याचा आरोपींना राग येऊन त्यांनी आपल्याला वाईट साईट शिवीगाळ करून व आरोपी भागीनाथ रक्ताटे यांनी आपल्याला लाथा बुक्क्यांनी व गजाने मारहाण केली असून गंभीर दुखापत केली आहे.

   दरम्यान या घटनेत फिर्यादिसह संतोष रक्ताटे,राजेंद्र रक्ताटे,विमल रक्ताटे आदी तीन जण गंभीर जखमी झाले आहे.त्यांना सरकारी ग्रामीण रुग्णालयात व लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.यातील एका जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे त्यामुळे या गुन्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यावर कलमे बदलू शकत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

  दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.व पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.११२/२०२४ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.जालिंदर तमनर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close