गुन्हे विषयक
लाच स्विकारताना दोन पोलीस गजाआड,नगर जिल्ह्यात खळबळ !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव पोलिस ठाण्यात बारा हजार रुपयांची लाच घेतांना कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार संतोष रामनाथ लांडे व पोलीस शिपाई राघव छबुराव कोतकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राज्यात लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असून लाचखोरीत महसूल विभाग पहिल्यावर तर पोलीस विभाग द्वितीय स्थानावर आहे.गेल्या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४३४ सापळे रचले असून त्यात ६०५ शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक केली आहे अशी धक्कादायक आकडेवारी एसीबीच्या संकेतस्थळावर गत वर्षी प्रकाशित झाली आहे.यात आता कोपरगाव तालुका मागे नाही असे वारंवार सिद्ध होत असून दोन वर्षांपूर्वी तब्बल चार तलाठी रंगेहात पकडले होते.आता कोपरगाव तालुका पोलिसांनी आपणही या प्रकरणी कोणत्याच प्रकारे महसूल विभागापेक्षा कमी नाही असे दाखविण्याचे ठरवलेले दिसत असून या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दोघां पोलिसांविरुद्ध असा गुन्हा लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”गुरुवार दि.०७ मार्च रोजी दुपारी ही घटना कोपरगाव तालुक्यात घ़डली आहे.या घटनेमुळे कोपरगाव पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
कोपरगाव पोलिस ठाण्यात तक्रारदार यांच्या संदर्भात दाखल असलेल्या एक गुन्ह्या दाखल असून या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार संतोष रामनाथ लांडे याच्या कडे आहे.
या गुन्ह्यात तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी तक्रारदार याने,”पोलीस शिपाई राघव छबुराव कोतकर याला भेटून माझ्याकडे ये” असे सांगितले असता तो कोतकर यांना भेटला असता कोतकर यांनी तक्रारदार यांचेकडे १५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती.मात्र हो ना करत ही रक्कम तडजोडीअंती १२ हजार रुपयांची ठरली होती.लाचेची रक्कम मागणी केली व कोपरगाव तालुका पोण्यातील कक्षात स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले आहे.
दरम्यानही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक चे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे,पोलिस हवालदार प्रफुल्ल माळी,सचिन गोसावी,पो.ना.विलास निकम यांच्या पथकाणे केली आहे.
याप्रकरणी लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की,”कोणीही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.या कारवाईचे कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे.