जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न,पोस्कोचा गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


  कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याचे हेरून तिला आपल्या वासनेची शिकार बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी राजेंद्र फुलारे याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांत,’पोस्को’ चा  गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

   

सदर गुंह्यातील आरोपीने दि.२६ डिसेंबर रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या क्लास वरून घरी आली असता व  घरात अन्य कोणी सदस्य वा नातेवाईक घरात नाही हि संधी साधत व तिच्यावर पाळत ठेवून तिच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला होता.तिचे तोंड दाबून तिला लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केली असल्याचे उघड झाले आहे.

कायदेशीर प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्येक टप्प्यावर मुलांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक हल्ले,लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरता लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा-२०१२ तयार करण्यात आला आहे.हा कायदा तयार करताना बालक प्रथम या तत्त्वाचा अंगीकार करण्यात आला.यामध्ये मुलांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने अहवाल देणे,पुराव्याची नोंद करणे आणि खास नेमण्यात आलेल्या विशेष न्यायालयांच्या मार्फत जलद गतीने खटले चालवणे याचा समावेश करण्यात आला आहे.या नवीन कायद्याद्वारे विविध प्रकारच्या गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना शिक्षा करता येईल,अशी तरतूद करण्यात आलेली आहे.मात्र तरीही असे गुन्हे राज्यात कमी होण्याची चिन्हे दिसत नाही.अशीच घटना नूकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली आहे.यातील आरोपी राजेंद्र फुलारे यास पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ अटक केली आहे.त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.

   सदर गुंह्यातील आरोपीने दि.२६ डिसेंबर रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या क्लास वरून घरी आली असता व  घरात अन्य कोणी सदस्य वा नातेवाईक घरात नाही हि संधी साधत व तिच्यावर पाळत ठेवून तिच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला होता.तिचे तोंड दाबून तिला लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केली असल्याचे फिर्यादी यांनी आपल्या मध्यरात्री दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान फिर्यादी हे अचानक  घरी आले असता आरोपी हा धक्का देऊन फरार झाला असल्याचे दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते आदींनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट दिली आहे व आरोपीस जेरबंद केले आहे.

  या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.६०१/२०२३,क ३५४,३५४(ड) ,४५२,५०६,भा.द.वि.कलम सह कलम-७,८ पोस्को प्रमाणे आरोपी विरुद्ध  गुन्हा दखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close