जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तरुणी बेपत्ता,कोपरगाव शहर पोलिसांत नोंद,खळबळ

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातून भाजीपाला आणण्यासाठी गेलेली वीस वर्षीय तरुणी गोदावरी नदी छोट्या पूलावरून बेपत्ता झाली असल्याची तक्रार मुलीचे पिता महेश प्रसाद गोमती प्रसाद (वय-४५)रा.महाराणा नगर जिल्हा लखमीपुर उत्तर प्रदेश ह.मु.पुणतांबा फाटा यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असल्याने कोपरगाव शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

 

मार्च महिन्यात सर्वाधिक मुली पुण्यातून २२४ तर त्या खालोखाल नाशिक १६१,कोल्हापूर जिल्ह्यातून ११४,ठाणे १३३,अ.नगरमधून १०१,जळगाव ८१,सांगली ८२,यवतमाळ ७४ युवती बेपत्ता झाल्याची नोंद आहे.त्यामुळे पालकांत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.अशीच घटना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

राज्यातील १८ ते २५ वयोगटातील तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून,याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.कारण मार्च २०२३ महिन्यात तब्बल ०२ हजार २०० मुली बेपत्ता झाल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे.म्हणजेच रोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे.विशेष म्हणजे बेपत्ता तरुणींमध्ये सर्वाधिक १८ ते २० या वयोगटातील मुलींचा समावेश आहे.तर जानेवारी महिन्यात १६०० आणि फेब्रुवारी महिन्यात ०१ हजार ८१० मुली बेपत्ता झाल्या असल्याची नोंद झाली आहे.बेपत्ता झालेली मुलगी जर अल्पवयीन असल्यास पोलीस अशावेळी अपहरणाची नोंद करतात.तसेच मुलगी अल्पवयीन असल्याने तिची ओळख जाहीर होणार नाही या हेतून पोलिसांच्या संकेतस्थळावर याची स्वतंत्र नोंद केली जात नाही.परंतु सज्ञान मुलींच्या बेपत्ता झाल्याची नोंद मात्र पोलिसांच्या संकेतस्थळावर केली जाते.धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींची संख्या अधिक असल्याचे देखील समोर आले आहे.मार्च महिन्यात सर्वाधिक मुली पुण्यातून २२४ तर त्या खालोखाल नाशिक १६१,कोल्हापूर जिल्ह्यातून ११४,ठाणे १३३, अ.नगरमधून १०१,जळगाव ८१,सांगली ८२,यवतमाळ ७४ युवती बेपत्ता झाल्याची नोंद आहे.त्यामुळे पालकांत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.अशीच घटना कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दि.२१ डिसेंबर रोजी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास घडली असून त्यामुळे मुलीच्या पालकांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

   दरम्यान ती शहरात गेली असता तिच्या सोबत लहान मुले होती.त्यांनी तिला खाऊ खाण्यासाठी पैसे मागीतले असता तिने त्यांना खाऊसाठी १० रुपये दिले व त्यानंतर मुले त्या ठिकाणी पुन्हा आले असता त्यांना ती घटनास्थळी आढळली नाही.त्या ठिकाणाहून ती कोणालाही काही एक न सांगता निघून गेल्याचे तिच्या पित्याने आपल्या  तक्रारीत म्हटलं आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव श्रहर पोलिसांनी आपल्या हरवले असल्याच्या दप्तरी नोंद क्रं.७१/२०२३ अनव्ये नोंद दाखल केली आहे.त्यात तिचे वर्णण रंगाने गोरी,उंची ५’,अंगात काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस,काळ्या रंगाची ओढणी,पायात रंगाची स्लीपर चप्पल,गळ्यात साध्या मण्याची हार,नाकात गोल रिंग,सोबत मोबाईल,त्याचा क्रं.९५८०८५०११४ असा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.दरम्यान या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close