गुन्हे विषयक
…त्या तरुणीचा निर्घृण खून,कोपरगाव गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील खडकी येथे सप्तशृंगी मंदिर जवळ २१ वर्षीय विवाहित पुतणीचा तिच्या काकानेच मुलासोबत बोलत असल्याच्या संशयावरून कुऱ्हाडीचे घाव घालून तिची निर्घृण हत्या केली असल्याची धक्कायक माहिती हाती आली आहे.नेहा संदीप कांबळे असे मयत महिलेचे नाव असून संतोष हरीभाऊ आरणे (वय-२६ वर्ष) असे आरोपी काकाचे नाव आहे.तो खडकी येथील रहिवासी आहे.दरम्यान शहर पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेतले असून सदर घटनेने कोपरगाव शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या बाबतचे सदरचे सविस्तर वृत्त असे,”कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या खडकी उपनगर परिसरात सप्तशृंगी माता मंदिराजवळ मयत विविहित महिला नेहा संदीप कांबळे हि तरुणी आपल्या माहेरी राहत होती. तिचा काका संतोष आरणे याने गुरुवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी मध्य रात्री सव्वा बाराच्या सुमारास कुऱ्हाडीने घाव घालून खून केला आहे.नेहा ही दांडिया खेळून आपल्या माहेरच्या घरी आली होती ती घराबाहेर बाथरुम साठी आली असता ती एका मुलासोबत बोलत असल्याचा संशय घेऊन काका आरोपी संतोष याने तिच्याशी वाद घालून नेहावर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याच्या हातात असलेल्या कु-हाडीने दोन्ही पायावर घाव करत तिला जबर जखमी केले होते. व त्यानंतर तो घटनास्थवरून फरार झाला होता.दरम्यान नजीकच्या ग्रामस्थानीं जखमी नेहाला उपचारासाठी कोपरगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.मात्र ती उपचारा दरम्यान मयत झाली आहे.सदर घटनेने कोपरगाव तालुका हादरा आहे.सदर मयत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर,पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेट दिली आहे.परिस्थिती नियंत्रणात आहे.
दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला असून आरोपी संतोष आरणे याला ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपी संतोष व मयत महिला यांचे अनैतिक संबंध होते व ती दुसऱ्यासोबत बोलत असल्याच्या संशयावरून त्याने हे कृत्य केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.सदर आरोपीने दोन दिवसांपूर्वी कुऱ्हाडीला धार लावल्याची माहिती मिळत आहे.याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
या प्रकरणी ज्योती नंदकिशोर आरणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.४९४/२०२३ भा.द.वि.कलम ३०२ प्रमाणे आरोपी संतोष हरीभाऊ आरणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहे.