गुन्हे विषयक
सरपंचास डंपर घालून मारण्याचा प्रयत्न,तिघांवर गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन भाऊसाहेब वाबळे (वय-४१) यांना शहाजापूर-पाथरे रोडवर दळवी शेडजवळ आरोपी गणेश शिवाजी नवले,योगेश संजय कोळपे व अन्य दोन अनोळखी इसम यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे वाळूचोरांची शहाजापूर आणि परिसरात दहशत पसरली आहे.

आरोपीने आपल्या ताब्यातील डंपर फिर्यादी सरपंच सचिन वाबळे यांचे अंगावर घालण्याचा प्रयत्न शिवीगाळ करून,लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दुसरा आरोपी योगेश कोळपे याने आपल्या ताब्यातील काळ्या रंगाच्या काचाच्या स्कॉर्पिओ गाडीचा (क्रं.एम.एम.१५ एफ.एफ.७००४) फिर्यादी सरपंच कोळपे याने वापर करून फिर्यादी कोळपे यांच्या डोक्यात दगड घालण्याचा व त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात गोदावरी निधीतून अवैध वाळू उलचण्यास प्रतिबंध आहे.तरही वाळूचोर वाळूला मिळणारे सोन्याचे भाव पाहून अवैध वाळू चोऱ्या करण्याचे थांबताना दिसत नाही.त्यातून त्यांच्या वाहनांचा भरधाव वेग अनेकांच्या छातीत धस्स करणारा असतो त्यामुळे नागरिक,छोटी वहाने आणि प्रवासी आदींना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते.त्यातून तालुक्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहे.मात्र त्यांचा बंदोबस्त होताना दिसत नाही अशीच घटना नुकतीच शहाजापूर येथील सरपंच सचिन वाबळे यांच्या बाबतीत उघड झाली आहे.
सदर घटनेत सरपंच फिर्यादी सचिन वाबळे यांनी म्हटले आहे की,”आपण रविवार दि.०८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४५ वाजता आरोपी डंपर चालक गणेश शिवाजी नवले रा.कोळगाव थडी यास म्हणाला की,’त्याचे ताब्यातील दहा टायर विना क्रमांकाचा डंपर तू गावातून जाताना हळू का चालवत नाही ? त्यावर त्याने आपल्या ताब्यातील डंपर फिर्यादीचे अंगावर घालण्याचा प्रयत्न शिवीगाळ करून,लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दुसरा आरोपी योगेश कोळपे याने आपल्या ताब्यातील काळ्या रंगाच्या काचाच्या स्कॉर्पिओ गाडीचा (क्रं.एम.एम.१५ एफ.एफ.७००४) फिर्यादी सरपंच कोळपे याने वापर करून फिर्यादी कोळपे यांच्या डोक्यात दगड घालण्याचा व त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.त्यास अन्य दोघा अनोळखी यांनी मदत केली आहे.यात फिर्यादी सचिन कोळपे हे गंभीर जखमी झाले आहे.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस हे.कॉ.संदीप बोटे यांनी भेट दिली आहे.
दरम्यान या आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४८०/२०२३ भा.द.वि.कलम ३०७,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.बोटे हे करत आहेत.