गुन्हे विषयक
दुचाकी चोरीचे सत्र सुरूच,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नगदवाडी येथील रहिवासी असलेले इसम ज्ञानदेव दशरथ कुदळे (वय-३०) यांनी दोन महिन्यापुर्वी विकत घेतलेली काळ्या रंगाची व लाल पट्टा असलेली,३५ हजार किंमत असलेली टी.व्ही.एस.स्टार सिटी दुचाकी (क्रं.एम.एच.१५ ई.वाय.३७१६) हि दुचाकी स्वार हे किराणा दुकानात गेले असता अवघ्या वीस मिनिटात चोरी गेली आहे.नगदवाडी आणि कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी सदर फिर्यादीने तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण बेसुमार वाढले आहे.त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला का असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.त्यामुळे या चोऱ्या वरचेवर वाढत चालल्या आहेत.याला आळा घालणे गरजेचे असताना त्यावर कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही.सर्वच आघाड्यावर सामसुम दिसत आहे.तालुक्यातील झगडे फाटा येथे नागरिकांनी दोन संशयित दुचाकी चोरांना पकडले असून त्यात दोन चोरट्यांना तेथील उपस्थित नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.मात्र ते कोणत्या गुन्हयात पकडले हे समजू शकले नाही.कोपरगाव तालुक्यात चोऱ्या कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून नगदवाडी येथील आहे.
यातील फिर्यादी शेतकरी ज्ञानदेव कुदळे हे नगदवाडी सोनेवाडी येथील रहिवासी असून त्यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या खाजगी व घरगुती कामासाठी सुमारे ३५ हजार रुपये खर्चून टी.व्ही.एस.स्टार सिटी हि दुचाकी विकत घेतली होती.दि.०४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास किराणा आणावयाचा असल्याने त्यांनी नगदवाडी येथील चौकात आपली गाडी उभी करून ते किराणा दुकानात गेले होते.आपले काम आटोपल्यावर ते १५-२० मिनिटांनी आले असता त्या ठिकाणी त्यांनी आपल्या गाडीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.त्यांनी यासाठी आपल्या भावाची व आपल्या मित्रांची मदत घेतली होती.मात्र ती मिळून आली नाही.त्यामुळे त्यांची खात्री झाली की अज्ञात चोरट्यानी आपली गाडी हॅन्डलचे लॉक तोडून चोरून नेली आहे.अखेर त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे व व पो.हे.कॉ.आर.पी.पुंड यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा क्रं.४७६/२०२३ भा.द.वि.कायदा कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे हे करीत आहेत.